मुंबई - बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर नसल्याकारणाने आजसुद्धा निलेश साबळे शो होस्ट करणार आहे. बिग बॉसच्या घरात 'फुलवंती' सिनेमातील अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता गश्मीर महाजनी आले असून ते सदस्यांसोबत डान्सचा टास्क घेतात. जान्हवी, गरबा करते तर अभिजीत हिप-हॉप करतो. पुढे डीपी दादा नागिन डान्स तर निक्की लावणी करते. सूरजने भन्नाट असा प्राजक्तासोबत नागिन केला. प्राजक्ता आणि गश्मीर पुढच्या आठवड्यात जाणाऱ्या दोन सदस्यांची नावं जाहीर करतात. सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळी पुढच्या आठवड्यात जाणारे दोन सदस्य आहेत. निक्की आणि अंकिता यांच्यात सूरजवरून शाब्दिक चकमक होते. 'खूप कपटी, नालायक आणि स्वार्थी मुलगी आहे' असं निक्की अंकिताबद्दल बोलते. बिग बॉसच्या घरात 'पाणी' सिनेमातील कलाकार सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारे पाहुणे म्हणून येतात. सुबोध आणि सूरज यांच्यात मजा-मस्ती चालते. तुमचा हा पाण्याविषयी सिनेमा आहे तो हिट होणार, असं सूरज सुबोध आणि आदिनाथ यांना सांगतो आणि दोघांच्याही पाया पडतो. सूरजच्या या कृत्यामुळे त्याने पुन्हा एकदा सर्वांचं मन जिंकलं आहे. पुढे लक्झरी प्रोडक्ट्सचा टास्क होतो. टीम एमध्ये अंकिता, निक्की, सूरज, पॅडी दादा असतात. तर टीम बीमध्ये जान्हवी, अभिजीत, डीपी आणि वर्षा ताई असतात. या टास्कमध्ये 'टीम ए' जिंकते. पुढे सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारे पुढील आठवड्यात जाणाऱ्या सदस्यांची नावं जाहीर करतात. वर्षा उसगांवकर आणि अभिजीत सावंत पुढच्या आठवड्यात जाणारे सदस्य आहेत. पुन्हा सदस्यांमध्ये सूरजवरून बाचाबाची होते. बिग बॉसच्या घरात निलेश साबळेच्या 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या शोची संपूर्ण टीम सदस्यांचं मनोरंजन करण्यासाठी आले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात एलिमिनेशन प्रक्रियेत अंकिता वालावलकर, पॅडी कांबळे, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर या उरलेल्या सदस्यांपैकी म्हणजे पॅडी दादा एलिमिनेट झाले असून त्यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास इथेच संपला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/vHInTGw
No comments:
Post a Comment