Breaking

Monday, September 30, 2024

बिग बॉसच्या घरात फिनालेसाठी निक्की-सूरजमध्ये टक्कर ; 'या' सदस्याने मारली बाजी https://ift.tt/vtWAjSZ

मुंबई:‘बिग बॉस’च्या घरात नुकताच ‘फॅमिली वीक’ झाला. ‘बिग बॉस' मधल्या ‘फॅमिली वीक’ चा प्रेक्षकांनी खूप आनंद घेतला. या फॅमिली विकच्या निमित्याने घरातील सगळ्या सदस्यचे माईंड फ्रेश झाले असुन आता सगळे सदस्य जोमाने खेळ खेळण्यास सज्ज झाले आहेत. शेवटच्या काही दिवसांत घरातलं वातावरण मात्र बदलेलं दिसून आलं. निक्की सूरजची बाजू घेत अंकितासोबत भांडताना दिसली तर. अंकिता आणि अभिजीतमध्येही मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं.

सूरज झाला भावुक

तर पॅडी दादा आता घरात नसल्यानं सूरज भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. पॅडीदादाची सोबत नसली तरी मी जिद्दीने एकटा उभा राहणार, असा त्यानं स्वतःशी निर्धार केलाय. त्यानं माइकवर त्याच्या भावना व्यक्त केल्या. तर निक्की आणि अभिजीतमध्ये स्वतःची ड्युटी स्वतः व्यवस्थित करायची म्हणत वाद झाल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे डीपी अंकितामध्ये टास्कचं प्लॅनिंग सुरू होतं.सूरज अंकितावर नाराज?तर अंकित सतत सूरजला काही ना काही सूचना देत आहे. त्याच्यावर हक्क गाजवताना दिसतेय. यामुळं निक्कीनं तिला नुकतंच सुनावलं होतं. आता सूरज देखील निक्कीला मला अंकिता असं टोचून बोलते ते आवडत नाहीये, असं म्हणाल्याचं जान्हवी डीपीला सांगताना दिसली. पुढे बिग बॉस सर्वांना एक टास्क देतात. या टास्कमध्ये बहुमताने प्रत्येक सदस्याची किंमत ठरवायला सांगतात. निक्कीकडे ३०० कॉईन्स असल्यामुळे ती फिनाले वीकमध्ये पोहोचली असल्यामुळे ती या टास्कमध्ये सहभागी होऊ शकत नाही. सर्व सदस्यांच्या निर्णयानुसार आणि बहुमताने डीपीला एक लाख, वर्षा ताईंना चार लाख, सूरजला सहा लाख, अभिजीतला तीन लाख, अंकिताला दोन लाख, तर जान्हवीला चाळीस हजार मिळतात. जान्हवीला चाळीस हजारांची पाटी मिळते त्यामुळे तिचा राग-राग होतो आणि ती पाटी फडते. निक्की, जान्हवीला समजावते. पुढे बिग बॉस सर्वांना फिनाले वीकसाठी गाडीचा टास्क देतात. या टास्कमध्ये त्या गाडीवर बसून घरात ठेवलेले झेंडे गोळा करायचे असतात. निक्की या टास्कची संचालक असते. सुरुवातीला अंकिता येते. अंकिता चार मिनिटे एका सेकंदात १९ झेंडे गोळा करते. डीपी - ४ मिनिटं ४६ सेकेंदात १८ झेंडे तर वर्षा ताई ६ मिनिटं ३४ सेकेंद १९ झेंडे गोळा करतात. चौथ्या फेरीत सूरज ४ मिनिटं ४ सेकेंदात २० झेंडे गोळा करतो आणि पाचव्या फेरीत जान्हवी ४ मिनिटं १० सेकेंदात १९ झेंडे गोळा करते. शेवटच्या फेरीत अभिजीत ३ मिनिटं ५६ सेकेंदात १८ झेंडे गोळा केले. कार्याअंती पहिल्या क्रमांकावर सूरज, दुसऱ्या क्रमांकावर अंकिता, तिसऱ्या क्रमांकावर जान्हवी, चौथ्या आणि पाचव्या क्रमांवर वर्षा आणि अभिजीत तर सहाव्या क्रमांकावर डीपी असतात. सूरज तिकीट टू फिनालेचा उमेदवार झाला असल्यामुळे त्याच्याकडे असलेली किंमत ६ लाख प्राईज मनीमध्ये गोळा होते. सूरज आणि निक्की यांच्यामध्ये तिकीट टू फिनाले मिळवण्यासाठी टास्क होणार असल्याची घोषणा बिग बॉस करतात. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी बिग बॉस टास्क घेतात. या टास्कमध्ये जिंकणारा सदस्य सरळ फिनालेमध्ये पोहोचणार असतो. सुरुवातीला निक्की येते. निक्कीने ४ मिनिटे ४७ सेकेंदात रिंग शेवट पर्यंत पोहोचवलेली असते. पुढे सूरज येतो. त्याने ५ मिनिट ५ सेकेंदात रिंग शेवट पर्यंत पोहोचवली. कार्याअंती निक्की बिग बॉसची पहिली फायनॅलिस्ट बनली आहे. बिग बॉसच्या आठवड्यात कधीही मिड वीक एलिमिनेशन होऊ शकते असं सांगत सदस्यांना आश्चर्याचा धक्का देतात.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/EBev5cn

No comments:

Post a Comment