नवी दिल्ली : बांगलादेशने पाकिस्तानला काही दिवसांपूर्वीच धुळ चारली होती. आता त्यांचा सामना भारताशी होणार आहे. पण भारताशी सामना करण्यापूर्वी मात्र बांगलादेशच्या कर्णधाराने भारताला आव्हान दिले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटींच्या मालिकेस १९ सप्टेंबरला सुरुवात होणार आहे. यासाठी बांगलादेशच्या क्रिकेट संघाने रविवारी चेन्नईला प्रयाण केले. त्यावेळी बांगलादेशचा कर्णधार नजमुल होसेन शांतोने पत्रकारांशी संवाद साधला. ही मालिका सुरु होण्यापूर्वीच आता बांगलादेशच्या कर्णधाराने मोठा वक्तव्य केले आहे.'भारतातील मालिका खूपच आव्हानात्मक असेल. पाकिस्तानातील मालिका जिंकल्यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे. प्रत्येक मालिका ही आमच्यासाठी चांगली संधी आहे. आम्ही अर्थातच जिंकण्यासाठी खेळणार आहोत. विजय मिळवण्यासाठी होणारी प्रक्रिया महत्त्वाची असते. आम्ही आमचे काम योग्य प्रकारे केले, तरच यश मिळण्याची संधी असते, हे जाणून आहोत.भारतीय संघास चांगले आव्हान देण्याची आमची क्षमता आहे,' असे असे बांगलादेशच्या टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार नजमुल होसेन शांतो याने सांगितले.जागतिक कसोटी क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या, तर बांगलादेश चौथ्या स्थानी आहे. 'आमच्या आणि भारताच्या क्रमवारीत खूपच तफावत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आमची कामगिरी चांगली होत आहे. भारतातील दोन्ही कसोटींत प्रत्येक दिवशी चांगला खेळ करण्याचे आमचे लक्ष्य आहे. प्रत्येक कसोटीचा निर्णय पाचव्या दिवसातील अखेरच्या सत्रात होतो. त्या वेळी दोन्ही संघांना संधी असते,' असे त्याने सांगितले.भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेत दोन सामने असणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना हा येथे होणार आहे. त्यानंतर भारताचा दुसरा सामना हा कानपूर येथे होणार आहे. पण भारताने या दुसऱ्या कसोटीसाठी आपला संघ अजून जाहीर केलेला नाही. भारताचा संघ जेव्हा जाहीर झाला तेव्हा तो फक्त पहिल्याच कसोटीसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. संपल्यावर बीसीसीआय दुसऱ्या कसोटीच्या संघाबाबतचा निर्णय घेईल, असे आता समोर येत आहे. दुलीप ट्रॉफीतील चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची यावेळी दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/EXcU8ZQ
No comments:
Post a Comment