Breaking

Monday, September 16, 2024

टी २० वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारताचा माइंडगेम, कर्णधार हरमनप्रीतचे भन्नाट प्लॅनिंग https://ift.tt/sLmHjYg

मुंबई : टी २० वर्ल्ड कपमध्ये भारतासह गतविजेता ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना म्हणाली, 'टी-२० क्रिकेटमध्ये अखेरची चार-पाच षटके महत्त्वाची असतात. तुम्हाला लढत जिंकायची असेल, तर त्या दरम्यान संघाची मानसिकता कणखर असायला हवी. मागील काही काळापासून आम्ही यावरच लक्ष केंद्रित करीत आहोत. कारण, अखेरच्या षटकांत मानसिकदृष्ट्या तुम्ही शांत असाल, तर योजना व्यवस्थित अमलात आणता येतात.''आम्ही दीर्घकाळापासून मानसिक तंदुरुस्तीवर काम करीत आहोत. कारण, टी-२० क्रिकेटमध्ये अखेरची तीन-चार षटके खूप महत्त्वाची असतात. टी-२० क्रिकेट वाटतो तितका छोटा प्रकार नाही. सरतेशेवटी तुम्हाला ४० षटके खेळायचीच असतात. तेव्हा येथेही तुमची मानसिक कसोटी लागतेच,' असे मत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली.भारताला २०२०च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने ८५ धावांनी नमविले होते. अंतिम स्पर्धेतील दडपणाचा सामना भारतीय फलंदाज करू शकले नव्हते. ९९ धावांत गारद झाला होता. त्यानंतर २०१७च्या वन-डे वर्ल्ड कपमध्येही भारतीय महिला अंतिम फेरीत दडपण व्यवस्थित हाताळू शकल्या नव्हत्या. भारताने इंग्लंडला ७ बाद २२८ धावांत रोखले होते. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना एक वेळ भारतीय संघ ३ बाद १९१ अशा चांगल्या स्थितीत होता. यानंतर २८ धावांत भारताच्या सात फलंदाज बाद झाल्या होत्या. भारताचा डाव २१९ धावांत आटोपला होता. २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीतही भारताला ऑस्ट्रेलियाकडून असाच थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. या वर्षीच्या आशिया कपच्या अंतिम लढतीत भारताला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला.या पार्श्वभूमीवर बोलताना हरमनप्रीत कौर म्हणाली, 'या सर्व गोष्टींचा विचार आम्ही केला आहे. त्यासाठी आम्हाला मानसिकदृष्ट्या कणखर असायलाच हवे. त्यावरच सध्या आम्ही काम करीत आहोत. जेणेकरून स्पर्धेदरम्यान अशा अडथळ्यांवर मात करता येईल.' भारताची सलामीची लढत चार ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर सहा ऑक्टोबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारताची लढत होईल. भारताची गटातील अंतिम लढत १३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शारजामध्ये होणार आहे. भारतीय संघातील खेळाडू विविध राज्यांतील आहेत. याबाबत बोलताना हरमनप्रीत कौर म्हणाली, 'आमच्या संघातील सर्व खेळाडू वेगवेगळ्या राज्यांतील आहेत. अशा वेळी तुम्हाला त्यांच्या संस्कृतींबद्दल माहिती मिळते. तुम्हाला कुठल्याच क्षेत्रात अशी विविधता बघायला मिळणार नाही. क्रीडा क्षेत्रातच असे घडू शकते.'


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/hrRV3Zn

No comments:

Post a Comment