: ऋषभ पंत हा खऱ्या अर्थाने कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा हिरो ठरला. पंतने यावेळी तुफानी शतक झळकावले. पंतच्या या शतकानंतर इशान नेगीने फक्त तीन शब्दांत आपली प्रतिक्रीया दिली आहे. या तीन शब्दांत इशाने सर्वांची मनं जिंकल्याचे आता म्हटले जात आहे.भारताचा तिसऱ्या दिवशी जलदगतीने फलंदाजी करू धावा जमवण्याची गरज होती. क्रीझवर होता, पण तो संयतपणे खेळत होता. त्यावेळी जलदगतीने धावा करण्याची जबाबदारी ही पंतने उचलली. पंतने दमदार फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले. जेव्हा लंच टाइम झाला होता, तेव्हा तो गिलच्या जवळपास बरोबरीत आला होता. लंच ब्रेकनंतर तर पंतने गिलपूर्वी आपले शतक पूर्ण केले. पंतच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावरच भारताला जलदगतीने धावा करता आल्या आणि बांगलादेशपुढे मोठे आव्हान ठेवता आले.पंतचे शतक झाले आणि त्यानंतर इशाची कमेंट वाऱ्यासारखी व्हायरल झाली. पंत आणि इशा एकमेकांना डेट करत असल्याचे काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. या दोघांचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते. त्यामुळे आता इशान पंतच्या शतकानंतर काय म्हणते, याकडे बऱ्याच जणांचे लक्ष लागलेले होते. इशाने यावेळी फक्त तीन शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आणि आपले मनोगत व्यक्त केले. इशाने यावेळी इंस्टाग्रामवर एक स्टेटस ठेवले होते. या मध्ये इशाने तीन शब्द लिहिले होते. इशाने लिहीले आहे की, ' ग्रेटफूल, थँकफूल, ब्लेस्ड...' या तीन शब्दांत इशाने पंतबाबतचा आपल्या भावना व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. इशाने आपली पोस्ट करताना पंतचे नाव घेतले नाही. पण पंतच्या शतकानंतर तिने ठेवलेलं हे स्टेटस कोणासाठी असेल, हे चाहत्यांना ओळखलं आहे. त्यामुळे पंतसाठी जे इशाने तीन शब्द वापरले आहेत, ते खरंच किती समर्पक आहेत असे चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे चाहत्यांना इशाची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. पंत बऱ्याच कालावधीनंतर खेळत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पंतने पुन्हा एकदा शतक झळकावत आपण चांगल्या फॉर्मात आल्याचे दाखवून दिले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/dW3nzPa
No comments:
Post a Comment