Breaking

Sunday, September 22, 2024

निक्की की अरबाज... कोण गेलं बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? शोच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं एलिमिनेशन https://ift.tt/y8A7zGK

मुंबई: 'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये आजही रितेश देशमुख 'भाऊचा धक्का' हा कार्यक्रम सादर करत नाही. त्याच्या जागी अभिनेता-सूत्रसंचालक डॉ. पोहोचतो. या कार्यक्रमात आज 'नवरा माझा नवसाचा २'ची टीम प्रमोशनसाठी पोहोचते. स्वप्नील जोशी आणि सुप्रिया पिळगांवकर घरातील सदस्यांसोबत 'डम डम डमरु वाजे' या गाण्यावर डान्सही करतात. त्यानंतर सुप्रिया-स्वप्नील मिळून सर्व सदस्यांना पदार्थ ओळखण्याचा खेळ खेळतात. जोडीने खेळायच्या या खेळात दोन्ही स्पर्धकांचे डोळे झाकले जातात, त्यांच्यातील एकाने पदार्थ चाखायचा असतो. त्यानंतर नेमका काय पदार्थ आहे, त्याचे नाव न घेता केवळ स्पष्टीकरण द्यायचे आणि दुसऱ्या स्पर्धकाने तो पदार्थ ओळखायचा, असा टास्क असतो. निक्की-अरबाज, वर्षा-डीपी, अभिजीत-अंकिता, सूरज-पॅडी, जान्हवी-निक्की अशा जोड्यांमध्ये हा टास्क खेळवला जातो. त्यानंतर अशोक मामा या घरामध्ये एन्ट्री घेतात. त्यावेळी अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर यांच्यातील मैत्रीचे नातेही सर्वांना पाहायला मिळते. अशोक सराफ आल्यानंतर निलेश साबळे बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांसोबत एक रंजक टास्क खेळतो. स्पर्धकांना काही वेगवेगळे शब्द दिले जातात, त्यावरुन मराठी सिनेमांची नावे फलकावर लावायची असतात. यानंतर वर्षा आणि सुप्रिया एकमेकींच्या गाण्यांवर धमाल डान्स परफॉर्मन्स सादर करतात. 'नवरा माझा नवसाचा २'ची टीम स्पर्धकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारते. तासभर खेळीमेळीने सुरू असणाऱ्या बिग बॉस मराठीच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा एकमेकांवर टीकास्त्र सोडले जातात. स्पर्धकांना असा टास्क दिला जातो की त्यांना त्याच्या आवडीच्या स्पर्धकाला 'तिकिट टू फिनाले' द्यायचे आहे आणि नावडत्या स्पर्धकाला रद्द करण्याच्या तिकिटावर शिक्कामोर्तब करायचे आहे. ९ स्पर्धक यानुसार त्यांच्या नावडत्या स्पर्धकावर टीका करत हा टास्क खेळतात.अशोक मामा 'बिग बॉस मराठी'च्या घरात त्यांच्या 'अशोक मा.मा' या मालिकेबद्दल सांगतात. ते सांगतात की खरंतर मालिका करण्यासाठी ते तयार नव्हते. त्यांनी सांगितले की ही मालिका मर्यादित भागांची असणार आहे.

कॅप्टन असूनही अरबाज बिग बॉस मराठीच्या घराबाहेर

यानंतर नॉमिनेट झालेल्या सर्व स्पर्धकांना बिग बॉस Activity Room मध्ये बोलावतात. प्रत्येक स्पर्धकांना एकमेकांच्या समोर असणाऱ्या बॅग उघडायच्या असतात. त्या बॅगमध्ये 'सेफ' की 'अनसेफ'चा बोर्ड असेल. सुरुवातीला जान्हवी वर्षा ताईंची बॅग उघडते, त्यामध्ये 'सेफ' असे लिहिलेले असते, त्यानंतर वर्षा ताई सूरज यांची बॅग उघडतात आणि त्यामध्येही 'सेफ' असे लिहिलेले असते. निक्की आणि अरबाज यांच्या बॅगमध्ये 'डेंजर झोन' असे लिहिलेले असते, तर जान्हवीही सुरक्षित होते.शेवटी डेंजर झोनमध्ये असणाऱ्या स्पर्धकांपैकी जाणार असल्याचे बिग बॉस जाहीर करतात. घराचा कॅप्टन असूनही अरबाज घराबाहेर जातो, बिग बॉस मराठीच्या शोमध्ये असं पहिल्यांदाच घडलं असेल की कॅप्टन असताना एखादा स्पर्धक घराबाहेर पडला. निक्की ओक्साबोक्शी रडून बिग बॉसला विनंती करते की, त्याला एक संधी द्यावी आणि त्याला घराबाहेर काढू नये. त्याला अलविदा करतानाही निक्की त्याचे पाय पकडून बसते, त्याने घर सोडून जाऊ नये अशीच तिची इच्छा असते. अरबाज जाता जाता जान्हवीला सांगतो की, निक्की आता एकटी पडली आहे, तिच्याशी भांडू नको.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/h21EKeg

No comments:

Post a Comment