Breaking

Tuesday, September 17, 2024

Raigad : उच्चस्तरीय समिती नेमून विसर्जनातील दगडफेक प्रकरणाची चौकशी करा, सकल हिंदू समाजाची मागणी https://ift.tt/1glBJcA

रायगड, अमुलकुमार जैन : जिल्ह्यातील शांतता प्रिय असणाऱ्या मुरुड शहरातील भोगेश्वर पाखाडी येथे गौरी गणपती विसर्जन मिरवणुकीवर समाज कंटकाकडून दगड फेकून मुरुड शहरासहीत तालुक्यात जिल्ह्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी रायगड पोलिसच्या वतीने उच्च स्तरीय समिती नेमून दगडफेक प्रकरणात जे कोणी समाजकंटक दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी मुरुड पोलिस ठाण्यात रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे मुरुड सकल हिंदू समाजाने निवेदनद्वारे केली आहे. गुजरात राज्यातील सुरत येथे दीड दिवसाचे गणपती विसर्जन मिरवणुकीवर सुद्धा लहान मुलांना हाताशी धरून दगड फेक करण्यात आली होती. त्याचप्रकारे मुरुड शहरसहित जिल्ह्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाज कंटक यानी दोन लहान मुलांना हाताशी पकडुन त्यांच्यामार्फत केला होता. हिंदू समाजाच्या गणेशोत्सव काळात दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी भोगेश्र्वर पाखाडी येथील पन्नास ते साठ गौरी गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती.सदर प्रकरणानंतर दुसऱ्या दिवशी मुरुड पोलिस ठाणे येथे सदर दगडफेक करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी जमले असता मुरुड पोलिसांनी काही हिंदू बांधवावर जमावबंदी म्हणून गुन्हे दाखल केले होते.पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गौरी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर गुरुवार १२/०९/२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान दोन लहान मुलांकडून जाणीवपूर्वक विसर्जन मिरवणूकीवर दगडफेक करण्यात आली. हिंदुच्या तक्रार नोंदवून घेण्याच्या या संविधानिक मागणीला पोलिसांनी सरळ धुडकावत पोलिसांनी ही तक्रार घेण्यास २४ तास का लागले? या घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करावी. असे विविध मुद्दे निवेदनात म्हटले आहे. मुरुड भोगेश्वर पाखाडी जवळ गौरी गणपती विसर्जन मिरवणूकीवर दगडफेक केल्याने त्यांच्या निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मुरुड आझाद चौका पासुन ते तहसीलदार कार्यालया जवळ महामोर्चा काढण्यात येणार होता.परंतु पोलिस कडुन परवानगी न मिळाल्याने व शहरात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा न काढता मुरुड पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.या घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशाननाची कोणतेही परवानगी न घेता मोर्चा काढणार या संदर्भातील माहिती पोलिसांना मिळताच पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड शहरांसह पंचक्रोशी भागात ठिक ठिकाणी व नाका नाक्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.आज सकाळ पासून मोर्चा च्या ठिकाणी अलिबाग उपविभागीय पोलिस अधिकारी-विनित चौधरी यांनी स्वतः लक्ष ठेवून हा मोर्चा होऊ नये यांचे प्रयत्न करत होते.त्याला यश आले.पोलिसांच्या विनंतीला व स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये. सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा न काढण्याचा निर्णय घेण्यात आला त्याऐवजी मुरुड पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस अधीक्षक- सोमनाथ घार्गे यांना निवेदन देण्यात आले.

पोलीस प्रकरणात काय म्हणाले..

यावेळी पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की गौरी गणपती विसर्जन मिरवणूकीवर दगडफेक झाली त्याची माहिती घेतली गेली. १२ वर्षाच्या आतील दोन लहान मुले असल्याने त्यांच्यावर कारवाई व अटक करु शकत नाही.आपला देश बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान वर चालतो.कारवाईची कोणतीच तरतूद नसल्याने त्या लहान मुलांवर कारवाई करता आली नाही.परंतु त्या मुलाच्या आईवर तक्रार दाखल करुन गुन्हा दाखल केला आहे. हा तपास योग्य पध्दतीने सुरू आहे.लवकरच तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल.पण संयम पाळा कायदा हातात घेऊ नये आज मोर्चा निघाणार होता मोर्चाला पोलिसांकडुन महसूल विभाकडुन कोणतेही परवानगी घेतली नव्हती.जिल्ह्यात शांतता राहिली पाहिजे जो गुन्हा करेल त्यावर कडक कारवाई केली जाईल.तपास योग्य पध्दतीने सुरू आहे. प्रत्येकांनी संयम पाळला पाहिजे. सोशल मिडियावर जी ऑडिओ क्लिप फिरत होती त्याची तपासणी करुन त्या महिलेवर ११९/२४ भारतीय न्याय संहिता ३५३(क)२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.लोकांच्या मनात या घटनेबाबत जेवढ्या शंका आहेत.त्या सर्व शंका तपासुन संबंधितांवर गुन्हे दाखल करणारच.या शिवाय केलेल्या तपासाची माहिती सर्व जनतेला सुध्दा देण्यात येईल. तरी मुरुड तालुक्यातील नागरिकांनी शांतता राहुन प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/LU85BFX

No comments:

Post a Comment