Breaking

Wednesday, September 25, 2024

मुंबई विमानतळावरील उड्डाणसेवा मुसळधार पावसामुळे विस्कळीत, १४ विमानांच्या मार्गात केला बदल https://ift.tt/Tyoe0k2

मुंबई : बुधवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर जोरदार पाऊस आणि तुफान वाऱ्यामुळे विमान उड्डाणसेवेला व्यत्यय आल्याचे चित्र दिसले. परिणामी १४ उड्डाणे दुसऱ्या विमानतळावर वळवण्यात आले तर थेट सात विमानाचे लँडिंग रद्द करण्यात आली आहे. पावसामुळे प्रभावित झालेल्या फ्लाइट्समध्ये इंडिगोच्या (९), विस्तारा (२), एअर इंडिया (१), आकासा एअर (१) आणि गल्फ एअर (१) यांचा समावेश आहे. ही उड्डाणे अहमदाबाद, हैदराबाद, गोवा आणि उदयपूरसह विविध विमानतळांवर वळवण्यात आले आहेत.संततधार पडणाऱ्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे काही लँडिंग रद्द करण्यात आली आहेत. पहिले फ्लाइट राजकोटहून एअर इंडियाचे विमान होते, जे संध्याकाळी ६.१५ सुमारास मुंबईत उतरणार होते पण प्रचंड सुरु असलेल्या पावसामुळे उड्डाण लँडिंगसाठी अहमदाबादकडे वळवण्यात आले. दुसरे बँकॉकहून मुंबईला जाणारे इंडिगोचे फ्लाइट 6E1052, रात्री ८ वाजून ४ मिनिटांनी अहमदाबादकडे वळवण्यात आले.विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "रात्री ८.१५ च्या सुमारास सात उड्डाणे मुंबई विमानतळावर लँडिंगसाठी आले होते. पण खराब वातावरणामुळे सातही विमान मुंबई विमानतळाच्या जवळ घिरट्या मारत होते. त्यानंतर विमानतळाकडून लँडिंगसाठी पर्यायी मार्ग शोधून देण्यात आले. फ्लाइट ऑपरेशनला सुरुवातीला संध्याकाळी ६ च्या सुमारास सरासरी ३० मिनिटे उशीर झाला. परंतु पावसाचा जोर अधिक वाढल्याने रात्री १० वाजेपर्यंत फ्लाइट ऑपरेशनला एक तासापर्यंत वेळ लागू लागला. खराब हवामानामुळे उड्डाणाचे वेळापत्रक आणखी गुंतागुंतीचे बनले अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे भारतीय हवामान खात्याने (IMD)बुधवार आणि गुरुवार या दिवसांसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. आज दुपारपासून पावसाचा जोर वाढताना दिसून आला. मुलुंड, भांडुप तसेच अंधेरी भुयारी मार्ग यांसारख्या उपनगरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. तसेच लोकल सेवा देखील विस्कळीत झाली असून रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/OSxcVZo

No comments:

Post a Comment