भोपाळ: तामिळनाडू येथील तिरुचिरापल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) येऊन २१ वर्षीय एमसीएची आहे. तिच्या इंदूर येथील कुटुंबाने मध्य प्रदेश सरकारला तिला शोधण्याची विनंती केली आहे. बेपत्ता होण्यापूर्वी विद्यार्थ्याने 'पुरुषप्रधान जगाचे दु:खद सत्य' या आशयाचं एक पत्र लिहिलं होतं. इंदूर येथील राहणारे नूतेश गुप्ता यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, त्यांची मुलगी ओजस्वी गुप्ता (२१) १५ सप्टेंबरपासून एनआयटीच्या हॉस्टेलमधून बेपत्ता आहे आणि तिची कुठलीही माहिती अद्याप मिळालेली नाही. ओजस्वीचा मोबाईल फोनही बंद आहे.
महिनाभरापूर्वी एनआयटीत प्रवेश
नूतेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्टला त्यांच्या मुलीने एनआयटी त्रिचीच्या एमसीए अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता. ती पहिल्यांदाच अभ्यासासाठी इंदूर शहराबाहेर गेली होती. बेपत्ता होण्यापूर्वी, मुलीने एक पत्र देखील सोडले आहे. ज्यामध्ये तिने एनआयटी त्रिचीमधील वर्ग प्रतिनिधी म्हणजेच सीआर झाल्यानंतर मानसिक छळ आणि अभ्यासाच्या दबावाचा उल्लेख केला आहे.वडिलांनी पत्राचा हवाला देत सांगितलं की, कदाचित सीआर झाल्यानंतर ओजस्वीचा तिच्या वर्गमित्रांकडून छळ होत होता. माझ्या हुशार मुलीचे एनआयटी त्रिचीमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न होते. तिचे स्वप्नही पूर्ण झाले, पण महिनाभरात ती या संस्थेतून बेपत्ता होईल याची कधी आम्ही कल्पनाही केली नव्हती.ओजस्वीची आई आणि तिचा भाऊ त्रिचीला गेले आणि तामिळनाडू पोलिसांच्या मदतीने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना यश आले नाही. त्यांनी मध्य प्रदेश सरकार आणि इंदूर पोलिसांना आपल्या मुलीचा शोध घेण्याची विनंती केली आहे.इंदूरचे पोलिस आयुक्त राकेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार की, ओजस्वी बेपत्ता झाल्याबाबत त्यांनी त्रिची पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना सांगितले की, बेपत्ता असलेल्या विद्यार्थिनीचा शोध घेण्यासाठी इंदूर पोलीस त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.'महिलांचे नेतृत्व पुरुषांना स्वीकार करवून कठीण'
'पुरुषप्रधान जगाचे दुःखद सत्य' या शीर्षकाचे पत्र ओजस्वीने बेपत्त होण्यापूर्वी लिहिले. यामध्ये तिने लिहिलं की जर एखादी स्त्री ही सुंदर नसेल तर पुरुषांकडून सहमती घेणे किंवा पुरुषांना त्या स्त्रीचे नेतृत्व स्वीकारणे खरंच खूप कठीण आहे.बहिणीच्या आठवणीने भावाच्या डोळ्यातील अश्रू थांबेना
बेपत्ता झालेल्या आपल्या लहान बहिणीच्या आठवणीत मोठा भाऊ पलाश गुप्ता डोळ्यातील आसवं थांबवू शकत नाहीये. त्याने सांगितलं की, "जसजसा एक-एक दिवस जात आहे, तसतशी आमच्या मनात काहीतरी अघटित घडण्याची भीती वाढत चालली आहे. पण तरीही आम्ही देवाकडे प्रार्थना करत आहोत की माझी बहीण जिथे असेल तिथे ती सुरक्षित असावी."from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/PzBFiVZ
No comments:
Post a Comment