Breaking

Sunday, September 22, 2024

Slab Collapse : मुंब्य्रात जुन्या इमारतीचे प्लास्टर कोसळले, घटनेत पाच वर्षीय चिमुकलीचा झोपेतच मृत्यू https://ift.tt/aJkgoQ5

विनित जांगळे, ठाणे : मुंब्य्रात ३० वर्षीय जुन्या इमारतीतील सदनिकेचे प्लास्टर कोसळून पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत तिघे जखमी असून जखमींमध्ये एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. जखमींवर मुंब्य्राच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उनेजा शेख असे पडझडीत मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव असून झोपेतच तिच्यावर काळाने घाला घातला आहे. सदरच्या दुर्घटनेने मुंब्य्रामधील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंब्य्राच्या जीवनबाग परिसरात असलेल्या पाच मजली बानू टॉवरच्या बी विंगमध्ये तळमजल्यावरील अस्लम कुरेशी यांच्या घरात उमर शेख भाड्याने राहतात. शेख कुटुंबीय झोपेत असताना त्यांच्या स्वयंपाकघराच्या छताचे प्लास्टर कोसळले. यावेळी स्वयंपाकघरात झोपलेल्या उनेजा हिला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी तिला तातडीने मुंब्य्राच्या रुग्णालय येथे नेले असता रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. यासोबत दुर्घटनेत उमर शेख (२३), मुस्कान शेख (२१) व एक वर्षांच्या इजान शेख या तिघांना दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त बाळू पिचड यांनी घटनास्थळी भेट दिली, त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. मुंब्रा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, सार्वजानिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी याठिकाणी दाखल झाले. दुर्घटनाग्रस्त घरातील राडारोडा हटवण्यास सुरवात केली. या घटनेने शेख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

सदनिकेला केले सीलबंद

इमारतीमध्ये एकूण २० सदनिका व ०६ गाळे असून इमारत सी २ बी प्रवर्गात (इमारत रिकामी न करता संरचनात्मक दुरुस्ती करणे) येते. या इमारतीमधील संबंधित रहिवाश्यांना दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. प्लास्टर कोसळली सदनिका रिकामी करून तिला ठाणे पालिका प्रशासनाने सिल ठोकले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/YUDrxEh

No comments:

Post a Comment