सिंधुदुर्ग(प्रसाद रानडे,अनंत पाताडे): बाळासाहेब असताना दिल्लीपासूनचे सगळे लोक मातोश्रीवर यायचे आणि आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत फिरावे लागत आहे. मला करा, मला करा माझा चेहरा करा, त्यांचा चेहरा हा महाविकास आघाडीलाच चालत नाही तर महाराष्ट्राला कसा चालेल, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. आमच्याकडे ते नाही मला काय मिळेल यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळेल सर्वसामान्य जनतेला काय मिळेल हे पाहणारे आम्ही आहोत, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. कोकणात एकही ठाकरे गटाचा खासदार आला नाही. 13 पैकी सात जागा आम्ही शिवसेनेने जिंकल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती मंत्री उदय सामंत,ना.दीपक केसरकर,आमदार नितेश राणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शिवसेना भाजपा युती तीस वर्षे आहे. हे गटबंधन जुने आहे, मात्र त्याला कलंकित करण्याचे काम त्यांनी केले आणि त्यांना आज जी मिळालेली मते आहेत ती काँग्रेसची आहेत ही मतांची सूज आहे. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आणि वेगळी भूमिका मांडली त्यांना जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करत उद्धव ठाकरे यांना शिंदे यांनी टोला लगावला आहे.ते पुढे म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युतीचे सरकार यावे म्हणून मतदान झाले. मात्र आपल्या मतांशी बेईमानी केली तत्व सोडली शिवसेनेचे विचार सोडले भूमिका सोडली बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी बेइमानी केली. त्यांचा पराभव करण्यासाठी निलेश राणे शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.निलेश राणे आज स्वगृही परतले आहेत हातात धनुष्यबाण घेतल आहे. त्यामुळे खरं म्हणजे मी म्हणेन की ही एक प्रकारची घर वापसी आहे. खऱ्या अर्थाने निलेश राणे यांचा शिवसेनेचा प्रवेश म्हणजे महायुतीला एक प्रकारे मिळालेले बळ आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी निलेश राणे यांचे कौतुक केले. निलेश आपल्याच मित्र पक्षातल्या भाजपमधून शिवसेनेत आले आहेत. तर नितेश राणे भाजपात आहेत, ताटातलं वाटीत वाटीतलं ताटात हे काही वेगळे नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे बाळासाहेबांच्या शब्दावर जीवाला जीव देणारी ही कोकणी माणसं आहेत. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मी संघटनेत काम केल आहे. सभागृहात काम केल आहे. त्यामुळे कार्यकर्ता कसा जपायचा हे कौशल्य मी त्यांच्याकडे पाहिले आहे. कोकणातले भूमीने एका हातात धनुष्यबाण उचलले. आमच्याबरोबर अजितदादा यांची राष्ट्रवादी आहे, आमची आहे, आमच सरकार सर्वसामान्यांना काय पाहिजे हे देण्याचा विचार आम्ही केला, असे एकनाथ शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'सबका साथ सबका विश्वास सबका विकास' हा मंत्र आम्ही या राज्यातून डबल इंजिनच्या सरकारमधून पुढे घेऊन जात आहोत. अनेक प्रकल्प आपण पूर्ण केले आणि म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे गावातील माझ्या लाडक्या बहिणींमध्ये एक वेगळा विश्वास निर्माण झाला आहे, त्यांच्या हाताला काम मिळत आहे, आर्थिक स्वातंत्र्य मिळाल आहे. मात्र हे देखील पैसे त्यांना मिळू नये यासाठी कोर्टात गेली. मात्र या लाडक्या बहिणी ज्यांनी त्यांच्या योजनेत खोडा घातलाय त्यांना जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीचा समाजकार घेतला. राज्यातील सर्वसामान्य मुलींना उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना शंभर टक्के फी माफी देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला अशा विविध योजनांची माहिती त्यांनी दिली.मी या मतदारसंघात ठेकेदारी कधीच करणार नाहीकुडाळ मालवण मतदारसंघाची एक वेगळी ओळख होती या मतदार संघासाठी मंत्रालयातून विकासासाठी निधी मागायची वेळ येत नव्हती पण अशी ओळख या मतदार संघाला परत मिळवून देण्यासाठी ही माझी धडपड आहे. माझी धडपड कशासाठी मला कोणत्या पदाची गरज पण नाही. मला कोणावरही टीका करायची नाही मी गेल वर्षी दीड वर्ष झाले वैभव नाईक यांच्यावर मी टीकाच करत नाही कारण काही अर्थ नाही. निकृष्ट दर्जाचे रस्ते किती वेळा दाखवणार ? असा सवाल करत मी शिवरायांची शपथ घेऊन सांगतो मी या मतदारसंघात ठेकेदारी कधीच करणार नाही मी कधीच ठेकेदाराला फोन करणार नाही. मी कधीच दुसऱ्याच्या कामाला माझं काम सांगणार नाही,अशी टोलेबाजी निलेश राणे यांनी केली. माझ्यावरती संस्कार नाहीत जेव्हा उद्धव ठाकरेंचे सरकार होतं त्यावेळेला मी नारळ घेऊन भूमिपूजनाला कधीच गेलो नाही, मी माझं काम आहे तेच माझ्या सांगणार अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा भगवा खांदयावर घेतलेले माजी खासदार निलेश राणे यांनी मांडली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/MFc3pJH
No comments:
Post a Comment