सातारा: निवडणूक म्हटले की सत्ताधारी आणि विरोधक यांचे उमेदवार आले. पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी करणारे देखील असतात. यासोबत अपक्ष उमेदवार देखील रिंगणात उतरतात. लोकसभा निवडणूक असो वा विधानसभा निवडणूक प्रत्येक निवडणुकीत काही उमेदवार हे सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. अशाच लक्षवेधी उमेदवारांमध्ये सर्वात आघाडीवर असलेले नाव म्हणजे होय. सातारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आज २४ ऑक्टोबर रोजी अभिजीत बिचुकलेने आज उमेदवारी अर्ज दाखल केला. साधारणपणे एखादा उमेदवार अर्ज भरण्यासाठी येतो तेव्हा त्याच्या सोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते असतात. अभिजीत बिचुकले मात्र एकटाच आला होता. याबाबत विचारले असता त्याने आपल्या हटके स्टाइलमध्ये उत्तर दिले- भीड़ में सुअर आते हैं, शेर अकेला आता है.नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेल्या अभिजीत बिचुकलेने निवडणूक लढवण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी अनेक विधानसभा आणि लोकसभेची देखील निवडणूक त्याने लढवली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून बिचुकलेने उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. इतक नाही तर विधानसभेत शिवेंद्र राजे भोसलेविरुद्ध त्याने निवडणूक लढवली आहे. मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध देखील बिचुकले मैदानात उतरला होता. या शिवाय पंढरपूर, २०२३ साली पुणे कसबा येथील पोटनिवडणूक तर मनसेचे आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर खडकवासला येथे झालेल्या पोटनिवडणुकीत बिचुकलेने अर्ज दाखल केला होता. फक्त आमदारकी आणि खासदारकी नाही तर नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत राज्याचा मुख्यमंत्री मीच ठरवणार असे बेधडक वक्तव्य त्यांने केले होते. आजवर इतक्या निवडणुका लढून देखील अभिजीतला एकदाही विजय मिळवता आलेला नाहाी . एका लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना बिचुकलेने अनामत रक्कम म्हणून १२ हजार ५०० रुपयांची चिल्लर जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केली होती.२०१९च्या विधानसभा निवडणुकीत साताऱ्यातून त्याला ७५९ मते मिळाली होती. तर २००९ साली विधानसभा निवडणुकीत ८९१ मते मिळाली होती. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत अभिजीत बिचुकलेला सर्वात कमी म्हणजे २ हजार ४१२ मते मिळाली होती. २०१४ साली ३ हजार ६४४ मते आणि २००९ साली १२ हजार ६६२ मते मिळाली होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/CdAjBwQ
No comments:
Post a Comment