Breaking

Wednesday, October 23, 2024

शक्य असतानाही मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटला नाही? शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा थेट शरद पवारांना सवाल https://ift.tt/ONPnUrX

सातारा (संतोष शिराळे): मराठा आरक्षणाचा विषय टोकाला गेला आहे. शरद पवार म्हणतील ती पूर्व दिशा होती. त्यांना शक्य असतानाही मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटला नाही. मराठा आणि ओबीसीत ठिणगी पडायची वेळ आली आहे. कायद्याने टिकण्यारे आरक्षण हवे असेल तर फडणवीस आणि मोदी हे दोघेच ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता आरक्षण देवू शकतील, असे प्रतिपादन आमदार यांनी केले. सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा सातारा शहर आणि सातारा तालुका ग्रामीण भाग असा संयुक्त प्रचार मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी दोन्ही राजेंचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, माझ्या राजकारणाची वाटचाल सातारकरांच्या साथीने झाली आहे. सातारा-जावली मतदारसंघातील सर्वांना माझा प्रत्येक पैलू आहे. या विधानसभेच्या निवडणुकीकडे लोकसभेनंतर वेगळ्या नजरेतून बघणे गरजेचे आहे. विरोधक आरक्षण काढून घेणार आहे, अशी फेक नरेटिव्ह आणत आहेत. यापासून जनतेने सावध राहिले पाहिजे. खोटे व तथ्य नसलेले पसरवले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेमध्ये स्वत: सांगितले की जोपर्यंत मी आणि भाजप आहे, तोपर्यंत संविधानाला कुणाला हात लावू देणार नाही. देशापुढे त्यांनी भूमिका मांडली. एकीकडे महायुतीचे निवडणुकीला सामोरे जात आहे. नेमके आपल्यासाठी काम करणारे सरकार काेणते हे जनतेने जाणून घेणे आवश्यक आहे. मोदींनी ज्या योजना सुरू केल्या त्या चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. केवळ निवडणुकीपुरती कोणतीही योजना सुरू केली नाही. थेट लाभार्थी म्हणून त्याचा लाभ जनतेला मिळत आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. विरोधकांनी योजनेसाठी पैसे नसल्याचा गवगवा केला. महिलां रांगेत उभ्या राहिल्या तरी महाविकास आघाडीचे लोक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, ज्यावेळी योजनेचे हप्ते जमा होऊ लागले, त्यानंतर महाविकास आघाडीचे डोळे उघडले आणि पराभवाला सामोरे जावे लागणार असल्याची जाणीव त्यांना झाली. या योजनेला बदनाम करण्याचे महाविकास आघाडीकडून झाले आहे. हे सरकार योजना देणारे आहे तर विरोधक योजना काढून घेणारे आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे सर्व योजना बंद पडल्या, पगाराल पैसा नसल्याचे खोटे चित्र उभे केले जात आहे, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे मागच्या कर्जमाफीसह सर्व कर्ज शून्य केले. आयात होणाऱ्या सोयाबीनला कर लावून सोयाबीने मार्केट स्थिर ठेवले. आपला तालुका ऊस उत्पादक असून येथील अर्थकारण उसावर चालते. ऊस शेतकऱ्यांना केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी न्याय दिला आहे. त्यांनी दोन बैठका घेऊन एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेतला. साखर कारखान्यांना उत्पन्न कर माफ करून दिला, असे ते म्हणाले. काहीजण मी मंत्री होणार असल्याचेही सांगू लागले आहेत. परंतु यामुळे कार्यकर्त्यांना अतिआत्मविश्वास येऊ शकतो. या पायात माझी विकेट उडी नये, याची काळजी घ्या. अतिआत्मविश्वास घातक असतो, असे सांगत शिवेंद्रराजे भोसले यांनी एका उद्योगपतीची गोष्ट सांगून जागं रहा, असे आवाहन केले.दाजींना कोंडून ठेवामतदानादिवशी दाजी काय करतात, याकडे लाडक्या बहिणींनी लक्ष ठेवावे. ते इकडे-तिकडे जात असतील तर त्यांना कोंडून ठेवा, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/RTo12yx

No comments:

Post a Comment