Breaking

Tuesday, October 8, 2024

'भावंड' विशेषता पुरुष मंडळी असे पर्यंत घर एक असतं, पण...; अजित पवारांच्या विधानाची रंगली चर्चा https://ift.tt/4QXzghk

बारामती, दीपक पडकर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंबात दिसून येत असलेली हलकीशी कटूता उपमुख्यमंत्री यांच्या भाषणातून पुन्हा एकदा प्रत्ययास आली. असं म्हणतात की 'भावंड' विशेषता पुरुष मंडळी असे पर्यंत घर एक असतं. पण... असं म्हणत पुढील शब्द न उच्चारता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सध्या नवरात्र आहे. स्त्री शक्तीचा आदर केला पाहिजे. मातृशक्तीचा, स्त्रीशक्तीचा जागर केला पाहिजे. त्यामुळे त्या सर्वांना मी नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो.. असे म्हणत अजित पवार थांबले. आज बारामतीतील एका कार्यक्रमात अजित पवार असे बोलले आहेत. अजित पवारांच्या विधानाची आता एक वेगळीच चर्चा रंगली आहे. पवार कुटुंबात सुरु असलेली कटुतेचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर पाहायला मिळाला आहे.

पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागणार?

पुढच्या आठवड्यात राज्यात आचारसंहिता लागण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांनी परवा कॅबिनेट लावली आहे. कदाचित ही शेवटची कॅबिनेट असेल असे विधान पवारांनी केले. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल कधी वाजणार अशी उत्सुकता सगळ्याच राजकीय पक्षांना आहे. अशातच अजित पवारांनी थेट आचारसंहिता कधी लागू शकते यांचे संकेत दिले आहेत. अजित पवार पुढे म्हणाले राष्ट्रवादीतून बंडखोरीकरुन विकासासाठी आम्ही सत्तेत गेलो, लोकसभेला काय झालं त्यावर मला बोलायचं नाही.काही नारेटिव्ह सेट केला त्याचा जबरदस्त फटका बसला अशी कबूली अजित पवारांनी दिली. महायुतीत आणि महाविकास आघाडीत फक्त अर्धा टक्का मताचा फरक आहे. तरी आम्हाला राज्यात अनेक ठिकाणी जागांमध्ये फटका बसला. असे असले तरीही तिसऱ्यांदा मोदी प्रधानमंत्री होण गरजेचं होतं आणि तसेच झाले.

विकासकामांचा गाजावाजा करणे जरुरी..

विकासाकामांवर बोलताना अजित पवार म्हणाले, मी नुसते काम करायचो आणि सांगत नव्हतो की काय काम केले. पण आता कळले पाहिजे की ही कामे केली आहेत. बारामती शहर आणि तालुक्याला मी साडे आठ कोटींचा निधी आणला अशी अजित पवारांनी माहिती दिली. आपलं राज्य आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. सगळ्यात जास्त टॅक्स आपल्याकडे जमा होतो. अर्थमंत्री असल्याने मला माहित आहे, माझ्या तिजोरीत किती पैसे आहेत. माझ्या बहिणींना पैसे दिले तरी तो पैसा बाजारात येतो ना? शेतकऱ्यांना दिला तरी तो बाजारात येईल ना? आम्ही योग्य नियोजन केले आहे असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांना सुनावले.

महायुतीचे सरकार आणायचे!

आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचे सरकार आणायचं आहे असा विश्वास अजित पवारांनी बोलून दाखवला. हरियाणा तसेच जम्मू आणि काश्मीर वरील विधानसभा निकालावर सुद्धा अजित पवारांनी भाष्य केले. एक्झिट पोलवर कोण विश्वास ठेवणार नाही, कारण हरियाणात एक्झिट पोल फेल ठरले आणि वन साईड भाजपचे सरकार हरियाणा मध्ये आले आहे असे पवार म्हणाले. देशात याआधी किती पंतप्रधान होऊन गेलेत पण जे झाले नाही ते मोदींनी केले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मोदींनी मिळवून दिला. विरोधकांची दानत नाही कौतुक करण्याची असा टोला पवारांनी लगावला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/Czr2aGY

No comments:

Post a Comment