मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना आता वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. पण वानखेडे स्टेडियमवर जो अखेरचा सामना झाला होता तोदेखील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातच झाला होता. त्यावेळी कोणत्या संघाने बाजी मारली होती आणि कोणत्या खेळाडूने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती, याची चर्चा आता रंगत चालली आहे.या सामन्यात भारताने टॉस जिंकला होता. त्यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली होता आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भारतासाठी सलामी मयांक अगरवाल आणि यांनी केली होती. मयांकची बॅट तेव्हा चांगलीच तळपली होती. मयांकने पहिल्या डावात १५० धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. त्यामुळे भारताला पहिल्या डावात ३२५ धावांचा डोंगर उभारला होता. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाझ पटेलने यावेळी एकाच डावात १० बळी मिळवण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे हा सामना एजाझ पटेलच्या नावानेही ओळखला जातो. पण भारताच्या फिरकीपुढे न्यूझीलंडचा डाव गडगडला होता.भारताच्या फिरकी गोलंदाजांनी यावेळी फक्त ६२ धावांत न्यूझीलंडला ऑल आऊट केले होते. त्यावेळी आर. अश्विनने भारताकडून सर्वाधिक चार विकेट्स घेतले होते, तर मोहम्मद सिराजने तीन बळी मिळवले होते. भारताने पहिल्या डावात दमदार आघाडी घेतली होती आणि त्यांनी आपला दुसरा डाव ७ बाद २७६ धावांवर घोषित केला होता. त्यावेळी भारताने न्यूझीलंडला विजयासाठी ५४० धावांचे अशक्यप्राय असे आव्हान दिले होते. न्यूझीलंडचा डाव यावेळी १६७ धावांत आटोपला आणि भारताने ३७२ धावांनी मोठी विजय साकारला होता.वानखेडे स्टेडियमवरील यापूर्वीची भारताची कसोटी न्यूझीलंडविरुद्ध झाली होती. ही कसोटी भारताने जिंकली होती. एवढेच नव्हे तर यापूर्वीचा भारताचा वानखेडे स्टेडियमवरील सामना न्यूझीलंडविरुद्धच झाला होता. त्या वेळी भारताने वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडला पराभूत केले होते. भारताने २०२१च्या डिसेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धची कसोटी ३७२ धावांनी जिंकली होती. त्या वेळी भारताने न्यूझीलंडला ६२ आणि १६७ धावांत गुंडाळले होते. ही कसोटी एजाझ पटेलने एका डावात दहा विकेट घेतल्यामुळे संस्मरणीय झाली होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/xWyzJ5B
No comments:
Post a Comment