Breaking

Wednesday, October 30, 2024

तिसऱ्या कसोटी आधी भारतीय संघातील स्टार गोलंदाजाला झटका; विराट कोहली आणि पंतसाठी देखील आली मोठी बातमी https://ift.tt/qm5kZRd

दुबई: आयसीसीने बुधवारी पुरुषांच्या कसोटी क्रमवारीतील ताजी यादी जाहीर केली. या क्रमवारीत भारताचा आघाडीचा जलद गोलंदाज याला झटका बसला आहे. ताज्या क्रमवारीत बुमराहने अव्वल स्थान गमावले असून दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडाने त्याला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. रबाडा ८६० गुणांसह अव्वल क्रमांकावर असून, जोश हेझलवूड ८४७ गुणांसह दुसऱया, तर जसप्रीत बुमराह ८४६ गुणांसह तिसऱया क्रमांकावर आहे. बुमराहची दोन क्रमांकांनी घसरण झाली आहे. आर. अश्विनचीही (८३१) घसरण झाली असून, तो चौथ्या क्रमांकावर आहे. पुणे कसोटीत बुमराहला एकही विकेट मिळाली नाही. दुसरीकडे, रबाडाने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत चमक दाखवली.त्याने मीरपूर कसोटीत ९ विकेट घेतल्या होत्या. त्याच बरोबर कसोटी त्याने ३०० विकेटचा टप्पा पार केला होता. ही कसोटी आफ्रिकेने ९ विकेटनी जिंकली होती. भारताचा रवींद्र जडेजाचीही दोन क्रमांकांनी घसरण झाली असून, तो आठव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या नोमान अलीला आठ क्रमांकांनी फायदा झाला असून, तो नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. फलंदाजांच्या यादीत जो रूट अव्वल क्रमांकावर असून, केन विल्यमसन दुसऱया आणि भारताचा यशस्वी जयस्वाल तिसऱया क्रमांकावर पोहोचला आहे.फलंदाजांच्या क्रमवारीचा विचार केला तर भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याला क्रमवारीत फायदा झाला आहे. पुण्यात न्यूझीलंड झालेल्या कसोटीत त्याने ३० आणि ७७ धावांची खेळी केली होती. यशस्वी आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कसोटी क्रमवारीत तो भारताचा टॉपचा फलंदाज आहे. तर विकेटकीपर ऋषभ पंत आणि विराट कोहली यांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. पंतचे स्थान ५ स्थानांनी घसरले असून तो ११व्या स्थानावर पोहोचला आहे. तर विराट क्रमवारीत १४व्या स्थानावर घसरला आहे. भारताविरुद्धच्या दोन कसोटीत विजय मिळवणाऱ्या न्यूझीलंडच्या खेळाडूंना या क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. डेवोन कॉन्वे २८व्या स्थानावर, टॉम लॅथम ३४व्या, ग्लेन फिलिप्स ४५व्या स्थानावर पोहोचले आहेत. दोन्ही संघातील तिसरी आणि अखेरची कसोटी मुंबईत होणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/mxEwV4y

No comments:

Post a Comment