म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे पुरोगामी नेते आहेत. त्यांच्या एकट्याच्या घरात पदे किती आणि ओबीसींच्या घरात किती याचा विचार करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील खरोखरच मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे काय याचा विचार करण्याची गरज आहे, असे परखड मत ज्येष्ठ ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले. आजवर राज्यात २९पैकी २१ मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले. दर विधानसभेत २८८ पैकी १८० आमदार झाले. तरीही हा समाज मागास कसा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. व बहुजन समाजाच्यावतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात बुधवारी सायंकाळी ओबीसी महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात प्रा. हाके बोलत होते. व्यासपीठावर ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे, अॅड. पुरुषोत्तम सातपुते, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके, जिल्हा महासचिव अॅड. विलास माथनकर, नंदू नागरकर, सुरेंद्र रायपुरे, तनुजा रायपुरे, रिपाइं नेते प्रवीण खोब्रागडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रा. हाके म्हणाले, राज्याच्या प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ९० टक्के अध्यक्ष मराठा समाजाचे आहेत. मराठा समाज नसलेले एक तरी क्षेत्र दाखवा. पण, आज आज उठसूठ कुणीही उठतो आणि आरक्षण मागतो. मानवतेच्या दृष्टिकोनातून हिनतेची वागणूक दिली, त्यांना संविधानात आरक्षण दिले गेले. तेव्हा आरक्षण म्हणजे गरिबी हटाव, रेशनचे दुकान नव्हे हे ध्यानात ठेवा, असे सांगत जरांगे पाटील यांनाही टोला लगावला. मराठवाड्यातील ओबीसीविरोधी २५ आमदारांना या निवडणुकीत ओबीसी समाज घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिला. प्रास्ताविक प्रा. अनिल डहाके तर संचालन प्रलय म्हशाखेत्री यांनी केले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/LPHqE2c
No comments:
Post a Comment