शारजाह : भारताला अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता त्यांच्या महिला टी २० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. भारतासाठी हा सामना सर्वात महत्वाचा होता. कारण हा सामना जिंकवून भारतीय संघ सेमी फायनलमध्ये पोहोचू शकत होता. भारताला या सामन्यात विजयासाठी ऑस्ट्रेलियाने १५२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची कर्णधार आणि दीप्ती शर्मा झुंजार खेळी साकारत होत्या. दीप्ती २६ धावांवर बाद झाली, पण हरमनप्रीतची झुंज सुरुच होती. हरमनप्रीतने अर्धशतक झळकावत भारताच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या. पण तिला भारतासा सामना जिंकवून देण्यात अपयश आले. या विजयासह ऑस्ट्रेलिया महिला टी २० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.भारतापुढे विजयासाठी १५२ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला शेफाली वर्माने भारताला चांगील सुरुवात करून दिली. पण तिला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही, कारण शेफाली २० धावांवर बाद झाली. त्यानंतर भारताला स्मृती मानधनाच्या रुपात दुसरा धक्का बसला, तिला सहा धावा करता आल्या. जेमिमा रॉड्रिगेझला यावेळी १६ धावांवर समाधान मानावे लागले. पण त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरा आणि दीप्ती शर्मा यांची चांगली जोडी जमली होती.भारताला रेणुका सिंगने दमदार सुरुवात करून दिली होती. रेणुकाने तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सलामीवीर बेथ मुनीला बाद केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. बेथ मुनीला यावेळी फक्त २ धावा करत आल्या. रेणुका सिंगने त्यानंतरच्या चेंडूवर भारताला अजून एक यश मिळवून दिले. रेणुकाने जॉर्जिया वॉरेहमला शून्यावर बाद केले. रेणुकाने सलग दोन चेंडूंत विकेट्स मिळवल्या होत्या, त्यामुळे तिला हॅट्रिक मिळवण्याची चांगली संधी होती. पण रेणुकाची हॅट्रीक यावेळी हुकली.पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपाल डाव सावरला. कारण ग्रेस हॅरिसने यावेळी पाच चौकारांच्या जोरावर ४० धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर कर्णधार ताहिला मॅग्रा आणि एलिस पेरी या दोघांनी प्रत्येकी ३२ धावा केल्या आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या संघाला यावेळी दीड शतकाच्या पुढे पोहोचता आले. अखेरच्या षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने चांगला धावा जमवल्या आणि त्यांनी १५१ धावांचा डोंगर उभारला. भारताकडून यावेळी रेणुका सिंग आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. भारताने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या आठ खेळाडूंना बाद केले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/rGAPsla
No comments:
Post a Comment