मुंबई : मुंबईमधील यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. तीनवेळा आमदार आणि मंत्री राहिलेल्या सिद्दिकी यांची हत्या झाल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. तीन हल्लेखोरांनी जवळून गोळ्या घालत त्यांना जागीच संपवलं. हल्लेखोरांमधील दोन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आलं. तर एक जण अद्यापही फरार आहे. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची पथके बाहेर राज्यात रवाना झाली आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई ही टोळी असल्याचा दावा केला जात आहे. बिश्नोई तुरूंगातूनच आपली गँग चालवत असल्याचं बोललं जातं. अशातच सोशल मीडियावर बिश्नोईचा पाकिस्तानच्या एका गँगस्टरसोबत बोलत असल्याचा कथित व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. कथित व्हिडीओमध्ये लॉरेन्स बिश्नोई आणि पाकिस्तानचा गँगस्टर शहजाद भाटी एकमेकांसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत आहे. १९ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये बिश्नोई आणि भाटी एकमेकांसोबत बोलत आहेत. हा व्हिडीओ याच वर्षीचा जून महिन्यातील असल्याचं असून बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर परत एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिश्नोई हा आता गुजरातमधील साबरमती सेंट्रल जेलमध्ये आहे. तुरूंग प्रशासनावर बिश्नोईला मोबाईल वापरण्यासाठी दिल्याचा अनेकदा आरोप केला गेला आहे. मात्र हे आरोप तुरूंग प्रशासनाने कायम फेटाळून लावले आहेत. ज्या-ज्या वेळी बिश्नोई टोळीकडून गुन्हा केला जातो त्यावेळी लॉरेन्स बिश्नोई हा मौनव्रत पाळतो अशीसुद्धा माहिती समजत आहे. आताही त्याने तुरूंगामध्ये त्याने मौनव्रत पाळल्याचं बोललं जात आहे.
बाबा सिद्दिकींच्या हत्येची बिश्नोई गँगकडून जबाबदारी
बाबा सिद्दिकी यांची हत्या कोणी केली? हत्या करण्यामागचं कारण काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र फेसबुकवर शुब्बू लोणकर या अकाऊंटवर पोस्ट करत हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँग असल्याचं म्हटलं गेलं आहे. केंद्रीय यंत्रणा या पोस्टची सत्यता पडताळून पाहत आहे. तर हे अकाऊं अकोल्यातील शुभम लोणकर याचे असून त्याच्या भावाला प्रविण लोणकरला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. पोलिसांच्या ताब्यात आता धर्मराज कश्यप आणि गुरूनैल सिंग हे दोन्ही आरोपी आहेत. यामधील हरियाणाच्या गुरूनैल याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर शिवकुमार उर्फ शिवा हा तिसरा आरोपी फरार आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/MVpQZvb
No comments:
Post a Comment