Breaking

Saturday, October 12, 2024

भारताने दसऱ्याच्या दिवशी बांधले विजयाचे तोरण, बांगलादेशला चीतपट करत सामन्यासह मालिका जिंकली https://ift.tt/qXA9GTg

हैदराबाद : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखआली भारताने दसऱ्याच्या दिवशी विजयाचे तोरण बांधले. भारताने तिसऱ्या सामन्यात दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने टी २० मालिकेत बांगलादेशवर ३-० असे निर्भेळ यश मिळवले. संजू सॅमसनचे तुफानी शतक आणि त्याला सूर्याच्या मिळालेल्या झंझावाती साथीच्या जोराावर भारताने आपल्या स्वत:चाच विक्रम यावेळी मोडीत काढला. भारताने या सामन्यात २९७ धावांचा डोंगर उभारला आणि विजयाचा पाया रचला. बांगलादेशला हे आव्हान पेलवले नाही आणि भारताने त्यांच्यावर १३३ धावांनी मोठा विजय साकारला. या विजयासह भारताचा हा दुसरा टी २० मालिका विजय ठरला आहे.संजू सॅमसनने यावेळी आपल्या वादळापुढे बांगलादेशला लोटांगण घालायला भार पाडलले. संजूने यावेळी फक्त २२ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर संजू शतकाच्या दिशेने निघाला. सूर्याही यावेळी संजूला चांगली साथ देत होता. सूर्यानेही यावेळी वादळी खेळी साकारली आणि आपले अर्धशतकही पूर्ण केले. हे दोघे आता शतक पूर्ण करतील, असे वाटत होते. संजूने यावेळी आपेल शतक पूर्ण केले आणि भारतीय संघे द्विशतकाच्या दिशेने निघाला. संजूने यावेळी ११ चौकार आणि ८ षटकारांच्या जोरावर १११ धावांची अभूतपूर्व खेळी साकारली. संजू बाद झाल्यावर सूर्या शतक झळकावणार का, हे सर्व जण पाहत होते.सूर्या यावेळी शतकाच्या जवळ आला होता, पण त्याला शतकाले हुलकावणी दिली. सूर्याने यावेळी ३५ चेंडूंत ७५ धावा केल्या, त्यामध्ये ८ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. सूर्या बाद झाल्यावर आणि रायन पराग यांनी मैदान गाजवले. हार्दिकने यावेळी फक्त १८ चेंडूंत ४ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ४१ धावा केल्या. रायन परागने १३ चेंडूंत चार षटकार आणि एका चौकाराच्या जोरावर ३४ धावा केल्या. त्यामुळे भारताला २९७ धावा करता आल्या. भारताच्या २९७ आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. त्यानंतर बांगलादेशचा संघ हा धावांचा पाठलाग करण्यासाठी उभा राहू शकला नाही. त्यामुळे भारताने या सामन्यात सहज विजय साकारला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/u6wh9Jp

No comments:

Post a Comment