Breaking

Sunday, October 13, 2024

पाकिस्तानच्या मदतीने भारत सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतो, जाणून घ्या काय आहे नेमकं समीकरण... https://ift.tt/AyvDNEO

शारजाह : भारताला जर आता सेमी फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यासाठी मदत करू शकते. कारण महिला टी २० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलचे समीकरण आता समोर आले आहे. या समीकरणानुसार भारताला टी २० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता पाकिस्तान मदत करू शकतो.

पॉइंट्स टेबलमध्ये नेमकं घडलंय तरी काय...

भारताच्या 'अ' गटाटील पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया ८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि ती सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. भारतीय संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाचे चार गुण आहेत. पण तिसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडचेही चार गुण आहेत. भारत आणि न्यूझीलंडचे समान गुण असले तरी भारतीय संघ चांगला रन रेट असल्यामुळे दुसऱ्या स्थानावर आहे. पण न्यूझीलंडचा एक सामना बाकी आहे. त्यामुळे त्यांना विजयासह ६ गुणांनिशी सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी असेल. पाकिस्तान या पॉइंट्स टेबलमध्ये दोन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

पाकिस्तान भारताला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी कशी मदत करू शकते...

पाकिस्तानचा टी वर्ल्ड कपमध्ये एक सामान बाकी आहे. पाकिस्तानचा हा सामान न्यूझीलंडबरोबर होणार आहे. या सामन्यात जर पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केले, तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचे समान चार गुण होतील. पाकिस्तानचा रन रेट हा -०.४८८ असा फार कमी आहे. त्यामुळे सामना जिंकून त्यांनी चार गुण कमावले तरी त्याची सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे जर पाकिस्तानने न्यझीलंडवर विजय मिळवला तर तीन संघांचे समान चार गुण होतील. हे तीन संघ असतील पाकिस्तान, न्यूझीलंड आणि भारत. त्यानंतर सेमी फायनलमध्ये को पोहोचणार, हे रन रेटवर अवलंबून असेल. तिन्ही संघां सध्याच्य घडीला भारताचा रन रे सर्वात चांगला आहे. न्यूझीलंडचा पराभव झाला तर त्यांचा रन रेट अजून कमी होईल आणि ते सेमी फायनलच्या शर्यतीमधून बाहेर पडतील. पाकिस्तानने जर भला मोठा विजय साकारला नाही तर सामान जिंकनूनही ते सेमी फायनलमध्ये पोहोचणार नाही. त्यामुळे पाकिस्तानने न्यूझीलंडवर विजय साकारला तर भारत सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतो, असे हे समीकरण आहे.

भारत सेमी फायनलमध्ये पोहोचली असती, पण...

भारताेन जर ऑस्ट्रेलियावर विजय साकारला असता तर त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचता आले असते. पण त्यांना अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळेच त्यांना आता पाकिस्तानच्या विजयावर अवलंबून राहावे लागणार आहे.ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये दाखल झाली आहे. आता त्यांच्याबरोबर दुसरा कोणता संघ सेमी फायनलमध्ये पोहोचतो, याची उत्सुकता तमाम क्रिकेट विश्वाला लागलेली असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/YrmhTex

No comments:

Post a Comment