Breaking

Monday, October 14, 2024

मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी जाहीर केली; आता भाजप नेते मोठे पाऊल उचलण्याची शक्यता https://ift.tt/RLDqFCm

नागपूर (जितेंद्र खापरे) : रामटेक विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीकडून कोण उमेदवार असेल. याबाबतच्या सर्व शक्यता खोडून काढत यांनी विद्यमान यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आशिष जैस्वाल यांच्या शिवसेनेत प्रवेश झाल्याने शिंदे यांनी आपला निर्णय जाहीरपणे जाहीर केला आहे. आशिष जैस्वाल यांच्या शिवसेनेत प्रवेश झाल्याने शिंदे यांनी आपला निर्णय जाहीरपणे जाहीर केला आहे. अपक्ष आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. राज्यात महायुतीच्या जागावाटपापूर्वी शिवसेनेचा हा पहिलाच उमेदवार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पारशिवनी येथे 2 हजार कोटी रुपयांच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आणि त्याच व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांनी ॲड. आशिष जयस्वाल यांना शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी जाहीर केली.भाजप-शिवसेना महायुतीमध्ये रामटेक जागेसाठी रस्सीखेच सुरू असून गेल्या वेळी जयस्वाल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली होती. यानंतर ते सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले. पुढे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे झाले.त्यानंतर महायुती,माविआ संघर्ष सुरू झाला. आणि नंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांचा सोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपचे माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी आशिष जैस्वाल,कृपाल तुमाने आणि शिवसेनेविरोधात उघडपणे आघाडी उघडली आहे.मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी आशिष जयस्वाल यांच्या नावाला हिरवा कंदील दिला आहे. आता या घोषणेनंतर भाजप नेते आगामी काळात मोठे पाऊल उचलण्याची शक्यता बळावली आहे.महायुतीने लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून काँग्रेस मधून शिवसेनेत आलेले आमदार राजू पारवे यांना लोकसभेची तिकीट दिली होती. मात्र,त्यांचा काँग्रेसचे उमेदवार श्याम बर्वे यांनी पराभूत केले. 2024च्या विधानसभा निवडणुकीत रामटेकची जागा भाजपला द्यावी, अशी मागणी माजी आमदार मल्लिकाअर्जुन रेड्डी यांनी केली. अन्यथा रामटेक निवडणुकीत प्रचंड मतभेद निर्माण होतील, जे हाताळणे फार कठीण जाईल, असे ते म्हणाले होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/rp8P2sF

No comments:

Post a Comment