नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी 7,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कोकेन जप्त केले आहे. शुक्रवारी ईडीने दिल्ली, एनसीआर आणि मुंबईतील अनेक ठिकाणी छापे टाकले. जप्त केलेल्या पदार्थांमध्ये 602 किलोग्रॅमपेक्षा जास्त ड्रग्सचा समावेश आहे, ज्यामध्ये 562 किलोग्रॅम कोकेन आणि 40 किलोग्रॅम हायड्रोपोनिक गांजाचा समावेश आहे. आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ईडीने सुरू केलेला तपास दिल्ली पोलिसांनी 2 ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या एफआयआरवर आधारित आहे, ज्यामध्ये तुषार गोयल, हिमांशू कुमार, औरंगजेब सिद्दीकी आणि भरत कुमार या चार व्यक्तींची नावे आहेत.एफआयआरनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अंदाजे 602 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त केला आहे. ज्यामध्ये 562 किलोग्राम कोकेन आणि 40 किलोग्राम हायड्रोपोनिक गांजाचा समावेश आहे. त्यानंतर चारही आरोपींना अटक करण्यात आली. प्राथमिक आरोपी तुषार गोयल उर्फ डिक्की याने महिपालपूर येथील त्याच्या कुटुंबाच्या मालकीच्या गोदामात अंमली पदार्थांची खेप साठवून ठेवल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले आहे.केंद्रीय एजन्सीने म्हटले आहे की, तुषारने या वर्षी जूनमध्ये दुबई आणि थायलंडमध्ये अंमली पदार्थांची वाहतूकची योजना आखण्यासाठी त्यांच्या साथीदारांना भेटल्याचे आढळून आले आहे. अधिक तपासात असे दिसून आले की तुषार गोयल दुबईस्थित मास्टरमाइंडशी संपर्क करत होता, जो आधीपासून कोकेन आणि इतर अंमली पदार्थांच्या पुरवठ्यासाठी ओळखला जातो. या माहितीच्या आधारे तुषार गोयलच्या वसंत विहार आणि राजौरी गार्डन येथील निवासस्थानी छापा टाकण्यात आला. तसेच त्याचे साथीदार हिमांशू कुमार आणि भरत कुमार यांच्या प्रेम नगर आणि नालासोपारा मुंबई येथील घरांची झडती घेण्यात आली.ईडीने तुषार बुक्स पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड, ट्युलिप पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एबीएन बिल्डटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कार्यालयांवर दिल्ली, झंडेवालन आणि गुरुग्राम येथे अतिरिक्त छापे टाकले. एजन्सीने खुलासा केला की, या कंपन्या तुषार गोयल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या आणि नियंत्रित आहेत. झडतीदरम्यान, ईडीने महत्त्वपूर्ण आर्थिक कागदपत्रे जप्त केली ज्यात आर्थिक देवाणघेवाण तसेच आरोपी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या जंगम मालमत्तांचा तपशील देण्यात आला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/40r62of
No comments:
Post a Comment