Breaking

Tuesday, October 8, 2024

हरियाणातील भाजपचा विजय प्रतिस्पर्ध्यांसाठी ४४० व्होल्टचा धक्का देणारा; २०२७पर्यंत जाणवणार या धक्क्याचा परिणाम! https://ift.tt/dsEbfMn

हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत यांच्या नेतृत्वाखालील भाजपने मंगळवारी विजयाची हॅटट्रीक करणे हा राजकीय पंडितांसह भाजप प्रतिस्पर्ध्यांसाठी ४४० व्होल्ट चा धक्का देणारे आहेत. शेतकरी, बेरोजगारी, कुस्तीपटूंवरील अत्याचार आणि अग्निवीर सारख्या योजनांना विरोध आणि गेल्या दशखभरातील भाजपच्या कामगिरीवरील नाराजी (अॅंटी इन्कम्बन्सी) याचा एकत्रित परिणाम हरियाणात दिसेल हा बहुतेकांचा होरा साफ चुकीचा ठरवून भाजपने हरियाणाचे मैदान मारले हे सत्य आहे. हरियाणात फिरताना लोकांचा रोष स्पष्ट जाणवत होता व मतदानयंत्रांचा कौल बरोबर त्याच्या विरुध्द आहे याचा एक अर्थ, लोक आता प्रसारमाध्यमांशी बोलताना कमालीचे हुशार झालेत असाही होतो ! यंदा भाजपचा मतटक्का जवळपास ४० टक्क्यांपर्यंत वाढला पण काँग्रेसचाही मतटक्का २८ वरुन थेट ३९ टक्क्यांपुढे गेलेला आहे. भाजपच्या या धक्क्याचा परिणाम दिल्ली, झारखंड, बिहार आणि महाराष्ट्रापासून २०२७ च्या उत्तर प्रदेश निवडणुकांपर्यंत जाणवत राहणार आहे. महाराष्ट्रातील गिचमिड राजकीय परिस्थितीत हरियाणाप्रमाणे काॅंग्रेसबरोबर थेट लढत नसताना महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावणारा असा हरियाणाचा कौल आहे.राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्रात विरोधी महाआघाडीसमोरील आव्हाने वाढणार आहेत. आगामी जागावाटपापासून काँग्रेसकडे कमजोर खेळाडू म्हणून पाहिले जाईल. पंतप्रधान मोदी यांनी हरियाणा-जम्मू-काश्मिरात यंदा केवळ ४-४ सभा घेऊन पूर्वीसारखा प्रचारातिरेक करण्याचे टाळले. हरियाणा राज्याचे नैसर्गिक स्थान वेगळे आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेशापासून आणि जम्मू काश्मीरला जोडणारे हरियाणा हा राजधानी दिल्लीचाही उंबरठा आहे. या उंबरठ्यावरचे `माप`ओलांडताना यशाची हॅटट्रीक करुन भाजपने विरोधकांनाही सज्जड इशारा दिला आहे. भाजप व संघपरिवार यांच्यात समनव्याचा सेतू पुन्हा जोडला गेल्याचे हे पहिले लक्षण खुद्द मोदींसाठीही सुखद ठरणारे आहे. भाजपचे सूक्ष्म व्यवस्थापन, मनोहरलाल खट्टर सरकारविरुध्दची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री बदलण्याचा धाडसी निर्णय, त्यानंतर खट्टर यांचे बॅकसीटला जाणे या घटनाक्रमाकडे अतीआत्मविश्वासातील काँग्रेससह विरोधकांनी बारकाईने पाहिले नाही. भाजपपासून दुष्यंत चौताला यांचे निवडणुकीच्या तोंडावर दूर जाणे व नंतर त्यांचा जननायक जनता पक्ष, लोकदल आदींच्या निवडणुकीतील भूमीका हा योगायोग नव्हता. त्याचप्रमाणे हरयाणात दलित वर्गातील मोठा भक्तसंप्रदाय असलेल्या राम रहीमला पॅरोल मिळण्यापासून अरविंद केजरीवाल यांना मिळालेला जामीन हाही योगायोग नव्हता असाही या निकालांचा सांगावा आहे. हरियाणातील विजयाने नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना केंद्रातील सत्तेला साथ देणे क्रमप्राप्त ठरणार आहे. मोदी यांचा हाही एक विजय आहे. त्याचबरोबर देशातील विरोधी राजकारणाची दिशा आणि मार्गही बऱ्यापैकी निश्चित केला आहे. लोकसभेत विरोधकांची चांगली कामगिरी हा केवळ फ्ल्यूक होता व लोकांना भाजप हाच समर्थ पर्याय वाटतो, असा संदेश देण्यात मोदी - शहा पहिल्या टप्प्यात चांगलेच यशस्वी ठरले आहेत. हरियाणा, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र आणि झारखंड यापैकी काँग्रेस फक्त हरियाणामध्ये स्वबळावर लढला होता. आता या पराभवासाठी कुमारी सेलजा यांचे रुसवेफुगवे, विधानसभाही जिंकू न शकणारे रणदीप सुरजेवाला यांच्यासारखे नेते व मुख्य म्हणजे भूपेंद्रसिंह हुडा यांचे हरियाणवी एकछत्र या साऱ्यांवर हरियाणा पराभवाचे खापर फोडण्याची स्पर्धा सुरु आहे. मात्र हरियाणातील तिकीट वाटपापासून काँग्रेसचे सारे निर्णय राहुल गांधी यांनी घेतले होते त्यांच्या नेतृत्वावरील प्रश्नचिन्ह यामुळे गडद झाले त्याकडे काँग्रेस नेते दुर्लक्ष करतील पण इंडिया तील राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, द्रमुक व शिवसेना उबाठापासून अन्य पक्षांची भूमिका काय असेल.... आगामी काळात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीवरही हरियाणा-जम्मू काश्मिरातील निकाल महत्त्वाची भूमिका बजावतील. हे निकाल विरोधात गेले असते तर जे पी नड्डा यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या प्रस्तावित नियुक्तीमध्ये संघाचा पूर्ण वरचष्मा राहिला असता. आता तसे होणार नसल्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर मोदी यांचा एखादे लाडके नेते नड्डा यांची जागा घेण्यासाठी दिल्लीत बदलून येऊ शकतात व विनोद तावडे यांच्यासाख्या नेत्यांची घरवापसी होऊ शकते !


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/jq1mrQA

No comments:

Post a Comment