अमरावती, म. टा. प्रतिनिधी : ‘ मतदारसंघात बाहेरचे पार्सल नको, कमळच हवा,’ असे सांगत माजी खासदार यांनी माजी आमदार अभिजित अडसूळ यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. यासंदर्भातील त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवसेनेचे माजी आमदार अडसूळ हे दर्यापुरातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी दर्यापूरमधून विजय मिळविला होता. नंतरच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत महायुतीत शिवसेनेला ही जागा सुटावी यासाठी आग्रही आहेत. पण, त्यांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध होऊ लागला आहे. नवनीत राणा यांनी दर्यापुरातील एका कार्यक्रमात अडसूळ यांच्यावर थेट प्रहार केला. मेळघाट आणि दर्यापुरात कमळाच्या चिन्हावर उभा असणारा उमेदवार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होताच अडसूळ यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
मेळघाटवरही दावेदारी
माजी खासदार नवनीत राणा यांनी दर्यापूरसोबतच मेळघाटवरही भाजपचा दावा असल्याचे स्पष्ट केले आहे. आमदार राजकुमार पटेल यांनी बच्चू कडू यांचा ‘प्रहार’ सोडून शिवसेनेत प्रवेशाची तयारी चालविली आहे. लोकसभा निवडणुकीत पटेल यांनी राणा यांच्याविरोधात प्रचार केला होता. यातूनच राणा यांचा पटेल यांच्या उमेदवारीला विरोध वाढू लागला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.खा. श्रीकांत शिंदेंची दर्यापुरात सभा
नवनीत राणा यांच्याकडून माजी आमदार अभिजित अडसूळांच्या उमेदवारीला विरोध होत असताना सोमवारी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दर्यापुरात सभा घेतली. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. काँग्रेसमुळे ठाकरेंना काही जागा जिंकता आल्या. आगामी काळात काँग्रेस त्यांची विचित्र अवस्था करणार असल्याचेही ते म्हणाले.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/ikvyoaB
No comments:
Post a Comment