धुळे, अजय गर्दे : राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा सुरू आहे.दरम्यान या योजनेच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यातील एक लाडकी बहीणीचा व्हिडिओ चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. धुळे जिल्ह्यातील सोनगीर गावातील एका लाडक्या बहिणीने 'लाडकी बहिणी योजने'च्या माध्यमातून मिळालेल्या तीन हफ्त्यातून ४५०० रुपयांची चक्क दोन पितळेची भांडी विकत घेतली आहे. इतकेच नाही तर या भांड्यांवर चक्क राज्याचे यांचे नाव देखील टाकले आहे. लाडकी बहीण योजनेचा आम्हाला मोठा फायदा झाला आहे अशी प्रतिक्रिया महिलेने दिली. याच योजनेच्या पैशातून म्हणून दोन पितळेचे हंडे विकत घेतल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला सांगताना दिसत आहे. महिलेने फक्त भांडी खरेदी नाही केले तर मुख्यमंत्र्यांची म्हणजेच माझ्या लाडक्या भावाची आठवण आयुष्यभर घरात राहावी म्हणून महिलेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव देखील भांड्यावर टाकल्याचं व्हिडिओत दिसत आहे. आता महिलेचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील हप्त्याचे वाटप लवकरच..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील हप्त्याचे वाटप रविवारपासून सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीट करुन दिली आहे. पहिल्याच दिवशी या योजनेतील एकूण ३४ लाख ७४ हजार ११६ लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याचे वाटप पूर्ण झाले असल्याची घोषणा तटकरे यांनी केली. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील हप्त्याचे वाटप लवकरच करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. हे दोन्ही हप्ते एकाचवेळी लाभार्थ्यांच्या हातात जमा करण्यात येतील, असेही बोलले जात होते. त्यामुळे मुंबईसह राज्यातील सर्व लाभार्थ्यांचे याकडे लक्ष होते. अखेर रविवारी तिसऱ्या टप्प्यातील हप्त्याचे वाटप सुरू झाले. उर्वरित भगिनींच्या लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिनाअखेरपर्यंत लाभ मिळणार असल्याची माहिती यांनी दिली.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/i7GDUNw
No comments:
Post a Comment