Breaking

Wednesday, October 2, 2024

मोहम्मद शमी भडकला, म्हणाला मी इथे मेहनत घेतोय आणि तुम्ही तिथे... नेमकं काय आहे प्रकरण वाचा https://ift.tt/SvMuFUR

नवी दिल्ली : मोहम्मद शमी हा सध्या चांगलाच भडकला आहे. शमीने यावेळी एक ट्विट केले आहे आणि हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. शमीने यावेळी काही जणांना चांगलेच फटकारले असून यापुढे अशा गोष्टी करत जाऊ नका, असेही सांगितले आहे.मोहम्मद शमीने भारतामधल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये अविस्मरणीय कामगिरी केली होती. पण त्यानंतर त्याला दुखापत झाली. त्यामळे तो त्यानंतर आतापर्यंत कुठेही खेळताना दिसला नाही. शमीवर शस्त्रक्रीया करण्यात आली. त्यानंतर तो पूर्ण बरा झाला आहे आणि सध्याच्या घडीला तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिट होण्यासाठी धाम गाळत आहे. त्यामध्येच शमीबाबत एक अफवा पसरली होती आणि या गोष्टीचा त्रास शमीला झाला. शमीने त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट करत सर्वांनाच धारेवर धरले आहे.मोहम्मद शमी यावेळी म्हणाला की, " या प्रकारच्याअफवा का पसरवल्या जात आहेत. मी अथे अथक मेहनत घेत आहे. लवकरात लवकर मी फिट होण्याचा प्रयत्न करत आहे. मी बोर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत खेळणार नसल्याचे बीसीसीआयने सांगितले नाही आणि मीदेखील असं काही म्हणालो नाही. मी लोकांना विनंती करतो की, अशा गोष्टींवर विश्वास ठेव नये. या सर्व गोष्टी थांबवा आणि या ज्या फेक न्यूज आहेत त्या पसरवू नका. खासकरूम मी जर काही बोललो तरच या ती गोष्ट मान्य करा." शमी एक तर बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे. तो टी २० वर्ल्ड कपही खेळू शकला नाही. आगामी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या मालिकेसाठी तो सज्ज होत आहे. यासाठी तो मेहनत घेत आहे. पण एकिकडे तो मेहनत घेत असताना दुसरीकडे त्याच्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे शमी चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. भारतासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सर्वात महत्वाची असणार आहे. त्यासाठी शमीला राखून ठेवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. पण त्यापूर्वीच आता कोणीतरी शमी दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नसल्याची अफवा पसरवली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/X8lyiW9

No comments:

Post a Comment