इंदापूर (दीपक पडकर): आठ दिवसापुर्वी आम्ही सहा जणांनी राष्ट्रवादीचे यांच्याकडे आगामी इंदापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी याबाबत मागणी केली होती. परंतु आम्हाला कोणताही निर्णय मिळाला नाही. उलट माजी मंत्री यांचा सोमवारी इंदापूर येथे शरद पवार, जयंत पाटील व खा.सुप्रिया सुळे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश घेतला व निष्ठावंताना डावलुन हर्षवर्धन पाटलांना विधानसभा उमेदवारी देण्याचे संकेत दिल्याने शरद पवार गटातील नाराज असलेले पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, माजी उपनगराध्यक्ष भरत शहा व प्रविण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन तिसरा पर्याय देण्याचे संकेत दिले आहेत.यामुळे सध्या इंदापूर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ११ तारखेला मतदारांचा मेळावा घेवून कौल...!२०१४ ला अशीच मागणी केली होती,२०१९ ला अकलूजला शिवरत्न बंगल्यावर झालेल्या चर्चेत शब्द दिला होता. आम्ही किती दिवस अन्याय सहन करायचा. अजूनही १० तारखेपर्यंत वाट बघू अन्यथा ११ तारखेला तालुक्यातील मतदारांचा मेळावा घेवुन जनता जो निर्णयात्मक कौल देईल त्याप्रमाणे आम्ही तिसरा पर्याय निर्माण करून आगामी विधानसभा ताकदीने लढण्यासाठी दोन्ही आजी व माजी आमदारांना आव्हान देणार असल्याचा मनसुबा इंदापूर येथील सोनाई पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी व्यक्त केला. आमच्यावर कसलेही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत विद्यमान व माजी आमदार नको अशी नागरिक व कार्यकर्त्यांची भावना आहे त्यांना नवीन पर्याय हवा आहे. आम्ही २५ ते ३० वर्षापासुन जनतेची सेवा करत आहोत. आमच्यावर कसलेही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. तरीही आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर सारखा अन्याय का होतो. आम्हाला न्याय का मिळत नाही. हा विषय तालुक्यातील जनतेने समजुन घेतला पाहिजे. आम्ही ज्या पक्षात आहोत तो पक्ष सोडायचा किंवा नाही याबाबतचा निर्णय येत्या ११ तारखेला जुनी मार्केट कमेटी इंदापूर येथे तालुक्यातील मतदारांचा मेळावा घेऊन जनतेच्या मतानुसार निर्णय घेणार असल्याचे जगदाळे म्हणाले.लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आम्ही देखील तालुक्यातील ८०-८५ गावांमध्ये जाऊन सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. त्यामुळे मला उमेदवारी पाहिजे अशी भावना नसून उमेदवारी निष्ठावंतांना मिळावी अशी आमची मागणी असल्याचे जि.प. चे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी यावेळी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/ZSwnIyq
No comments:
Post a Comment