मुंबई - ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व यावर्षी २८ जुलै २०२४ला सुरू झालं होतं. दरवर्षी हा शो शंभर दिवसांचा असतो. मात्र, यावर्षी अवघ्या ७० दिवसांमध्ये पाचव्या पर्वाचा महाविजेता घोषित केला गेला. यंदाच्या सीझनमध्ये एकूण १६ स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या चक्रव्यूहात सहभाग घेतला होता. या १६ जणांपैकी अनेक अडचणींवर मात करून फक्त सहा जण टिकून राहिले होते. प्रेक्षकांनी केलेल्या प्रेमामुळे आणि मतांमुळे , सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर या सहा सदस्यांनी ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली. सुरुवातीला जान्हवी किल्लेकरने ९ लाख रुपये स्वीकारून बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या एलिमिनेशनमध्ये अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार एलिमिनेट झाले. शेवटी निक्की तांबोळीने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला. त्यानंतर सूरज चव्हाण आणि अभिजीत यांच्यात चुरशीची लढत होती. या शर्यतीत सूरज चव्हाण विजयी झाला असून अभिजीत सावंत उपविजेता ठरला आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच अभिजीतने पहिली पोस्ट केली आहे. अभिजीतने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, 'मंडळी…शब्दात व्यक्त नाही करू शकत मला जे वाटतंय ते…इतके nominations इतके votes आणि इतकं प्रेम! एका कलाकाराला फक्त प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा हवा असतो आणि मागच्या ७० दिवसांत तुम्ही सगळ्यांनी तो मला भरभरून दिलात! खूप खूप धन्यवाद! It was an emotional roller coaster for all of us. But we were together through all of this.' असं म्हणत अभिजीतने सर्वांचे आभार मानले आहेत. दरम्यान, अभिजीतच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी 'दादा आमच्यासाठी तूच विनर आहे', 'ज्याच्या नावातच 'जीत' आहे, तो नेहमीच विजयाच्या वाटेवरच असेल! अभीजीत म्हणजे फक्त नाव नाही, तर लाखो मनांचा खरा विजेता!', 'खरा विजेता', 'आमच्यासाठी खरा तूच विजेता आहेस 'अशा कमेंट्स केल्या आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/ON5biDs
No comments:
Post a Comment