कोल्हापूर (नयन यादवाड) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्वीच भाजप पक्ष आणि आम्ही ताराराणी पक्ष एकत्र भाजप म्हणून सामोरे जात आहोत. तसेच महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल आवाडे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. माजी आमदार आणि आम्ही कार्यकर्त्यांच मनोमिलन करण्यासाठी चर्चा करून निर्णय घेऊ. मात्र जिल्ह्यात भाजप अतिशय ताकतीने लढेल आणि जिंकेल असा विश्वास यांनी व्यक्त केलाय ते इचलकरंजी येथे बोलत होते.चहा पिण्यास आवडीच्या घरीइचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपमधील आवाडे आणि हाळवणकर यांच्यातील वाद आणि नाराजी चव्हाट्यावर आलाय. गेल्या महिन्याभरापूर्वी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला तसेच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून राहुल आवाडे यांची उमेदवारी देखील निश्चित झाली. मात्र यामुळे त्यांचे कट्टर विरोधक असलेले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार सुरेश हाळवणकर हे नाराज झाले. गेल्या महिन्याभरापासून इचलकरंजी मतदारसंघात सुरेश हाळवणकर गटातील आणि निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची नाराजी आणि खदखद बाहेर पडत होती. यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला होता. हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज इचलकरंजी येथे भाजपच्या मेळाव्यास उपस्थिती लावली. मात्र या मेळाव्यास आवाडे पिता पुत्रांना निमंत्रितच करण्यात आले नव्हते. यानंतर माध्यमांनी बावनकुळे यांना प्रश्न विचारले असता त्यांनी आवाडे यांच्या घरी चहा पिण्याचा नियोजित कार्यक्रम असल्याच सांगितले आणि कार्यक्रमानंतर आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरी उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते तर यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी येथे येणे टाळले. कार्यकर्त्यांच मनोमिलन करण्यासाठी चर्चा करून निर्णय घेऊदरम्यान भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्व काही आलबेल असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केल आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्वीच भाजप पक्ष आणि आम्ही ताराराणी पक्ष एकत्र भाजप म्हणून सामोरे जात आहोत. तसेच महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल आवाडे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि आम्ही कार्यकर्त्यांच मनोमिलन करण्यासाठी चर्चा करून निर्णय घेऊ तसेच या निवडणुकीची स्ट्रॅटर्जी आणि पक्षप्रवेश ठरवणार आहोत. आमच्यातील मतभेदाला पूर्णविराम मिळालेला आहे आणि आम्ही एकत्र काम करणार आहोत हे महत्त्वाचं आहे. शंभर टक्के कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणार आणि भाजप म्हणून काम करणार तसेच जिल्ह्यात ही भाजप अतिशय ताकतीने लढेल आणि जिंकेल असे आमदार प्रकाश आवाडे म्हणाले आहेत. लाँच केलं असं म्हणण त्यांच चुकीचतर एकेकाळी वेगवेगळ्या व्यासपीठावरून आम्ही समाजकारण आणि राजकारण करत होतो मात्र आता देशाला आणि नरेंद्र मोदी यांना ताकद देण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार येणं गरजेचं आहे. यामुळे सर्व जण एका व्यासपीठावर एका विचाराने आलो आहोत. जे काही समज गैरसमज असतील ते वेळोवेळी एकत्र बसून सोडवू आणि कामाला लागू. आम्ही केवळ या निवडणुकी पुरते एकत्र आलेलो नाही तर यापुढील सर्व निवडणुकांसाठी आम्ही एकत्र आहोत, असे राहुल आवाडे म्हणाले आहेत. दरम्यान सुरेश हळवणकर यांनी मेळाव्यात बोलताना आमदार प्रकाश आवाडे यांनी आपल्या लाडक्या मुलाला लॉन्च करत असल्याचे टीका केली होती याला देखील राहुल आवाडे यांनी प्रत्युत्तर दिला असून मला लाँच केलं असं म्हणण त्यांच चुकीच आहे. मी वयाच्या २० व्या वर्षापासून काम करत आहे. पूर्वी पक्षाला जेव्हा माझी गरज होती तेव्हा जिद्दीने मी कामाला लागलो आणि ज्यावेळी पक्षाने आणि माझ्या नेत्यांनी थांबायला सांगितले त्या ठिकाणी मी थांबलो आहे. आज मला लढायला सांगितला आहे म्हणून मी लढत आहे, असे राहुल आवाडे म्हणाले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/WdhbLXK
No comments:
Post a Comment