Breaking

Thursday, October 10, 2024

शकिब अल हसनने बांगलादेशच्या जनतेची का मागितली माफी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण... https://ift.tt/sJVazHx

नवी दिल्ली : बांगलादेशचा सर्वात अनुभवी खेळाडू शाकिब अल हसनने आता देशवासियांची माफी मागितली आहे. शकिबने संपूर्ण जगासमोर हे वक्तव्य केले आहे. कदाचित या वक्तव्यामुळे शकिबला बांगलादेशमधील कसोटी सामन्यात खेळता येऊ शकते.

शकिबने माफी मागताना काय म्हटले आहे...

फेसबूकवर माफी मागताना शकिब म्हणाला की, " ज्यांनी बांगलादेशमधील भेदभावविरोधी आंदोलनात सहभाग घेतला आणि प्राण गमावले किंवा जखमी झाले त्या सर्व विद्यार्थ्यांबद्दल मी श्रद्धांजली अर्पण करतो. प्रियजनांचे नुकसान काहीही भरून काढू शकत नाही. मुलाचे किंवा भावाचे नुकसान कोणीही भरून काढू शकत नाही. या कठीण वेळी माझ्या मौनाने दुखावलेल्यांची मी माफी मागतो."

शकिबला का मागावी लागली माफी...

शकिब अल हसनने आपला अखेरचा कसोटी सामना हा बांगलादेशमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्ती केली होती. आता दक्षिण आफ्रिकेचा संघ हा बांगलादेशमध्ये येणार आहे. दोन्ही देशांत २१ ऑक्टोबरपासून कसोटी सामना सुरु होणार आहे. हा आपला अखेरचा सामना असेल, असे शकिबने यापूर्वी म्हटले होते. पण बांगलादेशमध्ये गेल्यावर आपल्याला अटक होऊ शकते, असे शकिबला वाटत आहे. त्यामुळे जर आता आपण माफी मागितली तर आपल्याला कसोटी सामना खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकते, असे शकिबला वाटत आहे.

शकिबला अटक का केली जाऊ शकते...

शकिब हा बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्या जवळचा व्यक्ती समजला जायचा. हसिना यांच्या आवामी लीग पक्षाचा तो खासदारही होता. पण बांगलादेशमधून शेख हसिना याना बाहेर पडावे लागले. त्यानंतर शेख हसिना यांच्याबरोबर शकिबवरही हत्येचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आपण जर बांगलादेशमध्ये गेलो तर आपल्याला अटक होईल, असे शकिबला वाटत आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये जाण्यापूर्वी आता शकिबने देशवासियांची माफी मागितली आहे.

शकिब सध्या आहे तरी कुठे...

शकिब सध्याच्या घडीला अमेरिकेत आहे. शकिब अमेरिकेत नॅशनल क्रिकेट लीग टी १० खेळत असून तो लॉस एंजेलिस संघाचा सदस्य आहे. शकिबची पत्नी अमेरिकेची नागरिक आहे. त्यामुळे तो अमेरिकेत जास्त काळ व्यतित करत असल्याचे समोर येत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/CY78nPV

No comments:

Post a Comment