Breaking

Monday, October 21, 2024

उरण विधानसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना जागेसाठी आग्रही https://ift.tt/o94RqOx

रायगड, अमुलकुमार जैन : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आता प्रचाराला तिकिटासाठी धावपळ करायला वेग येणार आहे. उरण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आलाय. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाबाबत काय चाललंय कोणत्या जागांवर रस्सीखेच सुरू आहे. याबाबत उरण विधानसभा मतदार संघात जोरदार चर्चा सुरु झालेली आहे. चालू असलेल्या चर्चेमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह दिसत आहेत. माजी आमदार यांची उमेदवारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली होती. गाव,बूथनिहाय बैठका सुरुही केल्या आहेत. अशातच शेतकरी कामगार पक्षातून यांनी तर पायाला भिंगरी लावून नवरात्री उत्सवात उरण विधानसभा पिंजून काढला आहे. तर जयंत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस ज्येष्ठ नेते यांनी तर प्रीतम म्हात्रे उमेदवार असतील असे सांगून टाकले आहे. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून हे इच्छुक असल्याचे पत्र पक्षातील वरिष्ठांकडे दिले आहे. संतोष घरत हे कामगार नेते असून त्यांचाही जनतेशी दांडगा जनसंपर्क आहे. अनेकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. बहुजन चळवळीत ते सक्रिय आहेत त्यामुळे त्यांचेही पारडे जड दिसते.तर महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत उभे राहणार असल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे, त्यांच्याशी संपर्क केला असता मी निवडणूक लढणार नसल्याचे बोलले जाते मात्र त्यांच्या नक्की मनात काय हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे. अशाप्रकारे उरण विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. तसेच महायुतीमध्ये निवडणुकीसाठी उरण विधानसभेसाठी अपक्ष आमदार यावेळी भाजप पक्षातून महायुतीचे एकमेव उमेदवार असल्याचे दिसत आहे. तर एकला चलो रे म्हणत मनसे विधानसभेत उडी मारणार असून याचा फटका बसणार का ? बसला तर कोणाला बसेल हे मात्र पहावं लागेल.या पूर्ण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीच्या जागा वाटपात कोण बाजी मारेल हे येणाऱ्या काळात समजेल हे सर्व पाहताना आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/ugaJEUn

No comments:

Post a Comment