मुंबई - बिग बॉस मराठीच्या आजच्या एपिसोडमध्ये सकाळी निक्की, जान्हवी आणि अभिजीत खेळाबद्दल चर्चा करत असतात. अंकिता अभिजीतबद्दल 'ताटाखालचं मांजर' म्हणते. अभिजीत आणि अंकितामध्ये शाब्दिक चकमक होते. दुपारी बिग बॉसच्या घराची बेल वाजते आणि बिग बॉसचे एक्स-सदस्य सर्वांना भेटायला येतात. सर्व सदस्य आनंदी होतात.सुरुवातीला पुरुषोत्तम, योगिता आणि निखिल सर्वांना भेटायला येतात. पुरुषोत्तम सूरजच्या गावी गेलेलो असं त्याला सांगतो. अरबाज आणि घनःश्याम मात्र त्यांच्यासोबत आले नाहीत. डीपी, पुरुषोत्तमला खेळाबद्दल आणि टीमविषयी सांगतो. 'तुम्ही तुमच्या पद्धतीने खूप चांगलं खेळताय' असं पुरुषोत्तम डीपीला सांगतो. योगिता, अंकिताच्या बॉयफ्रेंडसोबत बोलल्याचं त्याला सांगतेय. पुरुषोत्तम, निक्कीला 'तो तुला भेटण्यासाठी रडतोय आणि तो धड जेवला पण नाहीये' असं अरबाजबद्दल सांगतो. पण निक्कीचा विश्वास बसत नाही. पुढे निक्की अभिजीतला बाहेर घेऊन जाते आणि अरबाजबद्दल सांगते. अंकिता सगळ्यांना त्यांच्या पिकनिक स्पॉटवर घेऊन जाते. निक्की तिच्या नाकाच्या सर्जरी बद्दल सांगत असते, तर एवढ्यात सूरज ती कोणाची तरी वाट बघतेय असं म्हणतो. तेवढ्यात बेल वाजते. वैभव, वर्षा ताई आणि इरिना येतात. निक्की, वर्षा ताईंच्या पाया पडते. 'घाणरेडा गेम खेळलाय तो, फेक माणूस आहे' असं वैभव जान्हवी आणि डीपीला अरबाजबद्दल सांगतो. डीपी, वैभव आणि पुरुषोत्तमला संग्रामबद्दल सांगतो. 'त्याने मला एकदम कोल्ड व्हाइब दिलं', असं निक्की अभिजीतला वैभवबद्दल सांगते. डीपी आणि इरिना कॅमेरासमोर डान्स करतात. पुढे जान्हवी आणि वैभव खेळाबद्दल चर्चा करत असतात. तेव्हा त्यांना स्वतःची चूक लक्षात येते. अंकितामुळे मला खूप जास्त त्रास झाला, कारण मी तिला नेहमी चांगलं सांगतो आणि तिचा अभिजीतवर जास्त विश्वास. त्यानंतर मी एकटाच खेळलो, असं डीपी निखिलला सांगतो. वैभव, आज मी इरिनाला भेटलोय असं जान्हवीला सांगतो. योगिता आणि निखिल अभिजीतसोबत बोलतात. पुन्हा दरवाजाची बेल वाजते. तेवढ्यात अरबाज धावत येतो आणि निक्कीला मिठी मारतो अन् तिला उचलून आतमध्ये घेऊन जातो. त्याच्यापाठोपाठ पॅडी दादा, घनःश्याम, संग्राम येतात. अरबाज, निक्कीला त्याची एंगेजमेंट झालं नसल्याचं आणि सगळं खोटं असल्याचं सांगतो. 'मी तुला सांगितलं होतं की मी कमिटेड आहे पण ते सगळं सॉल्व्ह केलं, माझी सेल्फ रिस्पेक्ट ठेऊन सगळं संपवलं. याआधी मी एक शो करून आलो होतो त्यात एक मुलगी होती तिला या शोमध्ये यायचं होतं. पण माझ्याबद्दल जे सांगितलं गेलं ते सगळं खोटं आहे' असं अरबाज निक्कीला सांगतो. वैभवला त्याची चूक कळल्यामुळे त्याने बी टीममध्ये प्रवेश केला आहे. डीपी, वैभव आणि पुरुषोत्तम अरबाजबद्दल चर्चा करतात, तेव्हा त्याने फक्त सर्वांचा वापर केला असं डीपी म्हणतो. पुढे, अरबाज निक्कीला 'तू काय फील करतेस माझ्याबद्दल' असं विचारतो. त्यावर निक्की त्याला म्हणते, 'मला आवडतोस तू, पण तुझ्याबद्दल हे जे सगळे बोलतायत त्यामुळे मला फेक वाटलं, मला समजत नाहीये मी काय करू' 'मी अभिजीतवर खूप नाराज आहे', असं आहे पॅडी दादा अंकिताला सांगतात. शेवटी बिग बॉस सर्वांचा निरोप घेतात. तेव्हा 'माझ्या मनात तुमचंच नाव असणार, घरावर पण तुमचं नाव कोरणार' असं सूरज म्हणतो.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/HjoYBMP
No comments:
Post a Comment