नागपूर: लग्नास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीला विजेचा धक्का देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी १० .१५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली. विक्की हजारे (वय ३१, रा. दहिबाजार),असे अटकेतील प्रियकराचे तर रोहिणी (वय ३१,बदललेले नाव),असे जखमीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, विक्की हा एका फायनान्स कंपनीत काम करतो. रोहिणीचा घटस्फोट झाला असून, ती ११ वर्षीय मुलासह आईकडे राहाते. चार महिन्यापूर्वी रोहिणी व विक्कीची फेसबुकवर ओळख झाली. दोघे चॅटिंग करायला लागले. दोघांचे प्रेमसंबंध जुळले. काही दिवसांपासून तिने विक्कीशी बोलणे बंद केले. याशिवाय त्याला लग्नासही नकार दिला. रोहिणीचे अन्य युवकासोबत प्रेमसंबंध जुळल्याचा संशय विक्कीला आला. ३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता तो रोहिणीच्या घरी आला. त्याने स्वयंपाक घरातून चाकू आणून रोहिणीच्या गळ्याला लावला. यावेळी नातेवाइकांनी मध्यस्थी केल्याने तो घरून निघून गेला.शनिवारी सकाळी पुन्हा तो रोहिणीच्या घरी आला. आवारातील खोलीत लपून बसला.रोहिणी कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी निघाली असता विक्कीने त्याच्या तातील पाण्याच्या मोटारचे वायर रोहिणीचा गळा व उजव्या हाताबाला बांधला तिला विजेचा धक्का दिला. रोहिणीने आरडाओरड केली. रोहिणीची आई व मुलगा मदतीसाठी धावले. शेजारी जमले. विक्की पसार झाला. रोहिणीने कपिलनगर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शोध घेऊन विक्कीला अटक केली. काही दिवसांपूर्वी विक्कीने अंबाझरी तलावात आत्महत्येचा प्रयत्न केला होता,असे कळते. कुख्यात गुंड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार कुख्यात गुंड व आरोपी पियूष वर्मा (वय १८ रा.चनकापूर)हा पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. ही घटना खापरखेडा पोलिस ठाण्यात घडली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, स्थानिक गुन्हेशाखेचे तीन पथक त्याचा शोध घेत आहेत. पीयूषविरुद्ध चोरी ,घरफोडी व प्राणघातक हल्ल्याचे गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी रात्री पीयूषकडे माऊझर आढळले. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरूद्ध शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शनिवारी दुपारी पोलिसांनी त्याला कोठडीतून बाहेर काढले. पोलिस त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी दस्तऐवज तयार करायला लागले. संधी साधून वर्माने हाताला बांधलेला दोर (हातकडी) काढला. कोणाचे लक्ष नसल्याचे बघून तो ठाण्यातून पसार झाला. एका कर्मचाऱ्याला पीयूष जागेवर दिसला नाही. दोर तेथेच होता. पोलिसांनी ठाण्याच्या आवारात त्याचा शोध घेतला. मात्र तो आढळून आला नाही. पोलिसांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी पोलिस ठाण्यात पोहोचले.स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/fiQ6EFZ
No comments:
Post a Comment