मुंबई : भाजपाची पहिली यादी आज जाहीर झाली आहे. राज्यातील अनेक नेत्यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. अशातच आता भाजपाच्या यादीची एका वेगळ्या कारणाने चर्चा रंगली आहे. भाजपच्या केंद्र सरकारने विधानसभेआधीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत मोठी घोषणा केली होती. मात्र आज पहिली यादी भाजपची केंद्रीय नेतृत्वाने हिंदीतून जाहीर केली आहे. भाजपाची हीच गोष्ट राजकीय वर्तुळात रंगली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देणाऱ्या भाजपाने विधानसभेची यादी हिंदीत काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यामध्ये अनेक जिल्ह्याची नावे सुद्धा चुकलेली आहेत. यामध्ये काही नावाचा उल्लेख चुकीचा करण्यात आला आहे. म्हणजेच, कणकवली - कंकावलीश्रीगोंदा - श्रीगोंडासतारा - साताराचिंचवाड - चिंचवडउरान् - उरणकोलाबा - कुलाबामालबार हिल - मलबार हिलमलाड पश्चिम - मालाड पश्चिममुरबाद - मुरबाडचंदवड - चांदवडऔरंगाबाद पूर्व - छत्रपती संभाजीनगर पूर्वराहुल प्रकाश अवाडे - राहुल प्रकाश आवाडेअमल महादिक - अमल महाडिक अमित सातम् - अमित साटम गणेश नाइक - गणेश नाईकराजन नाइक - राजन नाईकराहुल उत्तमराव ढिकाले - राहुल उत्तमराव ढिकले राहुल दौलतराव अहेर - राहुल दौलतराव आहेरआता केंद्रातून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणाऱ्या भाजप सरकारने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हिंदी पत्रक काढत यादी काढल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/hKygD2r
No comments:
Post a Comment