Breaking

Sunday, October 20, 2024

पराभवानंतर लोकेश राहुलने घरच्या मैदानात निवृत्ती घेतली? व्हिडिओमध्ये असं काय केलं पाहा https://ift.tt/ztslBAh

बंगळुरु : केएल राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अपयशी ठरला. राहुलचे हे घरचे मदानात होते. या घरच्या मैदानातील दोन्ही डावांत राहुल अपयशी ठरला. त्यामुळे राहुलने या पराभवानंतर कसोटी मालिकेतील निवृत्ती घेतल्याचे म्हटले जात आहे. कारण राहुलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये लोकेश राहुलने अशी एक कृती केली आहे की, त्यामुळे राहुलने निवृत्ती घेतल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. ही गोष्ट तेव्हा घडली जेव्हा हा सामना संपला. हा सामना संपला आणि त्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडू हस्तांदोलन करत होते. त्यावेळी लोकेश राहुल खेळपट्टीच्या जवळ आला आणि त्याने एक असे कृत्य केले की, त्यामुळे आता लोकेश राहुलने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे म्हटले जात आहे. राहुलची ही एक कृती सर्वांनाच आवडली, पण त्याचबरोबर हे निवृत्तीचे लक्षण असल्याचेही चाहत्यांनी म्हटले आहे.सामना संपला आणि सर्व खेळाडू एकमेकांशी संवाद साधत होते. राहुलही तिथे होते. राहलने यावेळी खेळाडूंशी हस्तांदोलन केले. त्यानंतर राहुल हा पीचजवळ गेला. पीच जवळ गेल्यावर राहुलने पीचला नमस्कार केला आणि त्यानंतर त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने जेव्हा निवृत्ती पत्करली होती तेव्हा त्याने पीचला नमस्कार केला होता. त्यामुळे सचिनची स्टाइल करत यावेळी राहुलने आपल्या निवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे.लोकेश राहुलचे हे घरचे मैदान होते. या मैदानात राहुल लहानाचा मोठा झाला. त्यामुळे सामना गमावला तरी एक कृतज्ञता म्हणून राहुलने ही कृती केल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. याबाबत राहुलने कोणतीही अधिकृतपणे माहिती दिलेली नाही, त्याचबरोबर बीसीसीआयनेही काहीच सुचित केलेले नाही. त्यामुळे जोपर्यंत राहुल किंवा बीसीसीआय याबाबत अधिकृपणे माहिती देत नाहीत, तोपर्यंत ही गोष्ट खरी असल्याचे समजले जाऊ शकत नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी ही फक्त चर्चाच आहे, असे समजले जाऊ शकते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/I9tyN6i

No comments:

Post a Comment