: भारताने न्यूझीलंडला विजयासाठी १०७ धावांचे आव्हान दिले आहे. बऱ्याच जणांना हे आव्हान विजयासाठी फारच कमी वाटत आहे. कारण न्यूझीलंड सहजपणे हा सामना जिंकेल, असे वाटत आहे. पण यापूर्वी भारताने १०७ धावांचेच टार्गेट देत सामना जिंकलेला आहे. भारताने त्यावेळी नेमका देत सामना कसा जिंकला होता, हे आता समोर आले आहे.ही गोष्ट घडली होती ती २००४ साली. त्यावेळी भारताचा सामना रंगला होता तो जग्गजेत्या ऑस्ट्रेलियाबरोबर. हा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर रंगला होता. या सामन्यातही भारताने ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी १०७ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघात रिकी पॉन्टिंग, मायकल क्लार्क, मॅथ्यू हेडन, अॅडम गिलख्रिस्ट, जस्टीन लँगर, सायमन कॅटीच, डॅमियन मार्टीनसारखे एकापेक्षा एक दिग्गज फलंदाज होते. पण तरीही ऑस्ट्रेलियाच्या संघाला १०७ धावांचे आव्हान पेलवता आले नव्हते. यावेळी झहीर खानने दुसऱ्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाला जस्टीन लँगरच्या रुपात पहिला धक्का दिला होता, त्याला भोपळाही फोडता आला नव्हता.वानखेडेच्या मैदानात त्यानंतर घोंगावलं होतं ते फिरकीचे वादळ. कारण भारताला विजय मिळवून देण्यासाठी धावून आला होता तो हरभजन सिंग. हरभजनने यावेळी हेडन, कॅटीच, ग्रिलख्रिस्ट, मायकल कॅस्प्रोव्हिच आणि ग्लेन मॅग्रा यांना बाद केले होते. हरभजनने या डावाच पाच विकेट्स मिळवत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यावेळी हरभजनला चांगली साथ दिली होती ती फिरकीपटू मुरली कार्तिकने. मुरलीने या सामन्यात तीन विकेट्स मिळवल्या होत्या. अनिल कुंबळे यांनी यावेळी एक बळी मिळवला होता. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाला ९३ धावांवर ऑल आऊट केले होते आणि १३ धावांनी दमदार विजय साकारला होता.यावेळी भारताचे कर्णधार होते ते राहुल द्रविड. यावेळी मुरली कार्तिकला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला होता. कारण मुरली कार्तिकने पहिल्या डावात चार तर दुसऱ्या डावात तीन बळी मिळवले होते. त्यामुळे या सामन्यातही जर भारताने न्यूझीलंडला १०७ धावांचेच आव्हान दिले असले तरी घाबरण्याची काही गरज नाही. कारण यापूर्वी भारताने फक्त १०७ धावांचे टार्गेट देऊन विजय मिळवला आहे. त्यामुळे ही गोष्ट पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते. त्यामुळे भारतीय संघाने आणि त्यांच्या चाहत्यांनी यावेळी मॅच गेली असं समजू नये, कारण अजूनही सामना भारतीय संघाला जिंकता येऊ शकतो.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/CUuoKzf
No comments:
Post a Comment