Breaking

Saturday, October 19, 2024

Vikhe Vs Thorat: विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने संघर्ष दुसऱ्या पिढीकडे https://ift.tt/lnmgbjO

लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे यातच महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. लोकसभेत महाविकास आघाडी ने ३० आणि एक अपक्ष जागा जिंकत आघाडी घेतली तर महायुती १७ जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव भरून काढण्यासाठी महायुती तर लोकसभेची आघाडी टिकवून ठेवण्यासाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या विधानसभा निवडणुकीचे पडसाद अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातही गाजताना दिसत आहेत.अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण म्हटलं की आपल्या समोर प्रामुख्याने विखे आणि थोरात हे दोन नावे येतात जिल्ह्यातील राजकारण या नावाच्या भोवताली फिरताना आपल्याला दिसतो. आणि राधाकृष्ण विखे पाटील हे एकच पक्षात असतांनाही दोन्ही नेत्यांमधील मतभेद समोर आले होते. आता दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षात आहेत. लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीमध्ये निलेश लंके यांनी त्याचा पराभव केला. लोकसभेतील पराभव हा विखेच्या जिव्हारी लागला. या पराभवाचा बदल घेण्यासाठी सुजय विखे यांनी थेट बाळासाहेब थोरात यांची मतदारसंघातच कोंडी करण्याच्या दृष्टीने थेट मतदारसंघामधून लढण्याची घोषणा केली. तसं त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठी कडे तिकीट देखील मागितले आहे. त्या दृष्टीने त्यांनी गणेशोत्सव तसेच विविध कार्यक्रमाच्या दृष्टीने राजकिय दौरे तसेच विविध भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासाठी त्यांच्या कन्या जयश्री थोरात या मैदानात उतरल्या आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघात जयश्री थोरात यांनी युवा संवाद यात्रा सुरू केली असून या यात्रेच्या अनुषंगाने जयश्री थोरात या गावोगावी भेटी देऊन युवक, महिला आणि जेष्ठांशी संवाद साधताय. संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात महायुतीकडून सुजय विखे यांच्या उमेदवारीची चर्चा असल्याने इथे विखे विरुद्ध थोरात असा राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे.काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात गेल्या ३५ वर्षांपासून संगमनेर विधानसभाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यांनी ७ वेळा या मतदारसंघामधून निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. या वेळेस सुजय विखेच्या रुपात त्यांना विधानसभेसाठी तगडे आव्हान भेटू शकते. सुजय विखे यांच्या आव्हानाला थोरात नेमका कसा प्रतिकार करतील हे पाहणे महत्वाचे आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/pNVAlWU

No comments:

Post a Comment