Breaking

Sunday, October 6, 2024

तुळजापुरात निवडणुकीआधीच घमासान! काँग्रेस आणि राष्ट्रवादी मागोमाग ठाकरे गटही जागेसाठी आग्रही https://ift.tt/Pbt1xHj

धाराशिव, रहीम शेख : विधानसभेचे बिगुल वाजण्यापूर्वीच निवडणुकाची चुरस रंगतदार होईल. यात शंका नाहीच कारण निवडणुकीपूर्वीच वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडवताना दिसतायत. अशातच आता उबाठा गटाने एन्ट्री केल्याचे दिसून येत आहे. उबाठा गटाचा येत्या ८ ऑक्टोबर रोजी ईटकळ येथे शिवसैनिकांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओम राजे निंबाळकर धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील सह संपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकर हे मार्गदर्शन करणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघापैकी तुळजापूर मतदारसंघांमध्ये सर्वाधिक इच्छुकांची गर्दी होताना दिसतेय. राष्ट्रवादी शरद पवार गट युवती प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर, अशोक जगदाळे यांनी गेल्या दोन महिन्यापासून प्रचाराला सुरुवात केली आहे तर काँग्रेस कडून माजी मंत्री मधुकर चव्हाण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट धीरज कदम पाटील, ओबीसी नेत्या डॉक्टर स्नेहा सोनकाटे, अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी गेल्या दोन महिन्यापासून तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराची राळ उठवली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असताना उबाठा गट मागे कसा राहील म्हणूनच की काय येत्या ८ ऑक्टोबर रोजी शिवसैनिकाला मार्गदर्शन करून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी देखील गेल्या दोन महिन्यापासून मतदारसंघ पिंजून काढलाय. त्यांनी महिला मेळावे घेत मतदार संघातील महिलांना साडी भेट सुद्धा दिली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माजी उपाध्यक्ष बसवराज मंगरूळे, रूपामाता उद्योग समूहाचे अध्यक्ष एडवोकेट व्यंकट गुंड हे देखील प्रचाराला लागले आहेत.प्रत्यक्षात निवडणुका जाहीर व्हायचे आहेत त्यापूर्वीच उमेदवार हे प्रचाराला सुरुवात करताना दिसते पुढील काही दिवसांमध्ये निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस कळेल की प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार असेल आणि कोणता नसेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/FVn6zd5

No comments:

Post a Comment