म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील जागावाटप जवळपास निश्चित झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (राशप) पक्ष जिल्ह्यातील जागावाटपात मोठा भाऊ ठरला आहे. जिल्ह्यातील १५ पैकी दिंडोरी, देवळाली, येवला, सिन्नर, नाशिक पूर्व, बागलाण या सहा जागा ‘राशप’च्या वाट्याला आल्या असून, कळवणची जागाही त्यांच्याकडे आहे. परंतु, ती ‘माकप’ला सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सात जागा या राशपला मिळणार असल्या तरी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमध्ये नाशिक मध्यच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील जागावाटप रखडल्याचे चित्र आहे.विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या जागावाटपाचे घोडे अद्याप अडकून पडले आहे. जिल्ह्यात लोकसभेचे अडीच, तर विधानसभेचे पंधरा मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव होऊन महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले. त्यामुळे लोकसभेचा कल विधानसभेला कायम राहिल्यास महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुकांचा ओढा वाढला आहे. महाविकास आघाडीकडे सर्वाधिक इच्छुक असल्यामुळे जागावाटपावरून राशप, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात रस्सीखेच सुरू आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले होते. त्यामुळे या सहा जागांवर ‘राशप’ने चर्चेत दावा केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जागावाटपात दिंडोरी, देवळाली, येवला, सिन्नर, नाशिक पूर्व, बागलाण या सहा जागा पदरात पाडून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. निफाडमध्ये राष्ट्रवादीचा आमदार असला तरी, या ठिकाणी माजी आमदार अनिल कदम यांच्यासाठी ‘उबाठा’ने ही जागा आपल्याकडे खेचून घेतल्याचे चित्र आहे. कळवणही ‘राशप’च्या वाट्याला आली असली तरी ही जागा ‘माकप’च्या माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्यासाठी सोडली जाणार आहे. त्यामुळे सात जागा पदरात पाडून घेत, राशप जिल्ह्यात मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे.चांदवड, मध्यवर दावाशनिवार (दि.१९ )रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, शहराध्यक्ष गजानन शेलार आणि माजी महापौर प्रकाश मते यांनी जिल्ह्यासह शहरातील जागावाटपासंदर्भात पुन्हा चर्चा केली. यात चांदवड आणि नाशिक मध्य मतदारसंघही घ्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी पवारांकडे केली आहे. परंतु, चांदवडवर काँग्रेसने दावा केला आहे. तर, नाशिक मध्यवरून आधीच शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये ताणातानी सुरू आहे. या जागांबाबत लवकरच निर्णय होईल, असे आश्वासन पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिले. उबाठा-काँग्रेसमध्ये संघर्षमहाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील १५ पैकी १४ जागांवरील तिढा सुटला असला तरी, नाशिक मध्य मतदारसंघावरून जागावाटप रखडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नाशिक मध्य मतदारसंघावर माजी आमदार वसंत गितेंसाठी उबाठा गटाने आपला दावा कायम ठेवला आहे. तर, या मतदारसंघात काँग्रेस पारंपरिकपणे लढत असल्याने आणि हा मतदारसंघ काँग्रेससाठी अनुकूल असल्याने त्यांच्या वाट्याला कायम ठेवावा, यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा तिढा सुटेपर्यंत जागावाटप होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. संभाव्य जागावाटपराशप : दिंडोरी, देवळाली, येवला, सिन्नर, नाशिक पूर्व, बागलाणकाँग्रेस : इगतपुरी, मालेगाव मध्य, चांदवड, नाशिक मध्यउबाठा : नाशिक पश्चिम, नांदगाव, निफाड, मालेगाव बाह्यमाकप : कळवणमहाविकास आघाडीचे जागावाटप सुरू असून, आतापर्यंत सहा जागा आम्ही लढण्याचे निश्चित झाले आहे. उर्वरित जागांबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे.- गोकुळ पिंगळे, उपाध्यक्ष, राशप
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/toDI2Ba
No comments:
Post a Comment