दुबई : दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा चोकर्स ठरला. कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ हा महिलांच्या टी २० वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. न्यूझीलंडच्या १५९ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने एकही विकेट न गमावता ५१ धावांची सलामी दिली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिका यावेळी चौकर्स नावाचा शिक्का पुसेल, असे दिसत होते. पण दक्षिण आफ्रिकेने पहिली विकेट गमावली आणि त्यांचा डाव त्यानंतर गडगडला. न्यूझीलंडने त्यानंतर सामन्यावरील पकड मजबूत केली आणि विजय साकारला. अंतिम फेरीत न्यूझीलंडने ३२ धावांनी दक्षिण आफ्रिकेवर विजय साकारला आणि महिलांचा टी २० वर्ल्ड कप उंचावला.दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला आणि त्यांनी दुसऱ्याच षटकात न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा हा निर्णय योग्य असल्याचे वाटत होते. पण त्यानंतर सुझी बेट्स आणि अमेलिया केर यांची जोडी चांगलीच जमली. सुझीने यावेळी तीन चौकारांच्या जोरावर ३२ धावांची खेळी साकारली. सुझी बाद झाली आणि त्यानंतर काही काळ अमेलियाने चांगला प्रतिकार केला, अती अर्धशतक पूर्ण करण्याच्या समीप आली होती. पण तिचे अर्धशतक हुकले. अमेलियाने चार चौकारांच्या जोरावर ३८ चेंडूंत ४३ धावांची खेळी साकारली. अमेलिया बाद झाली की, न्यूझीलंडचे काय होणार हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण या प्रश्नाचे उत्तर न्यूझीलंडच्या एका खेळाडीने दिले. न्यूझीलंडच्या मदतीला धावून आली ती ब्रुक हॅलिडे. ब्रुकने यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचा चांगलाच समचार घेतला. ब्रुकने धडाकेबाज फटकेबाजी केली आणि संघाला शंभर धावांचा पल्ला ओलांडून दिला. ब्रुकने यावेळी फक्त २८ चेंडूंत ३८ धावांची तुफानी खेळी साकारली. त्यामुळेच न्यूझीलंडच्या संघाला दीडशे धावांचा पल्ला गाठता आला. महिलांच्या टी २० क्रिकेटमध्ये १५० धावांचे लक्ष्य आव्हानात्मक समजले जाते आणि तेच यावेळी पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेच्या संघालाहे आव्हान पेलवले नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला.दक्षिण आफ्रिकेचा संघ १५९ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच उतरला आणि त्यांनी ५१ धावांची सलामीही दिली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ यावेळी चोकरर्सचा शिक्का पुसेल, असे वाटत होते. पण जेव्हा त्यांची पहिली विकेट पडली त्यानंतर त्यांचा डाव उभा राहू शकला नाही. कारण त्यानंतर फक्त २६ धावांत दक्षिण आफ्रिकेने आपला अर्धा संघ गमावला आणि तिथेच त्यांचा पराभव निश्चित झाला.महिला टी २० वर्ल्ड कपची फायनल यावेळी चांगलीच रंगली. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांनी तोडीस तोड केला आणि त्यामुळेच चाहत्यांना या फायनलचा मनमुराद आनंद लुटता आला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/vkFE4CW
No comments:
Post a Comment