Breaking

Saturday, November 23, 2024

लाडक्या बहिणींकडून सत्तेची भेट! महायुतीचा अभूतपूर्व विजय, आघाडीचा धुव्वा, कोणाला किती जागा मिळाल्या? https://ift.tt/bZulh4B

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर निर्माण झालेल्या नकारात्मक परिस्थिती बदलण्यासाठी महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राबविलेली तसेच हिंदू मते एकत्रित करण्यासाठी, , एक है तो सेफ या दिलेल्या घोषणा यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहिणींनी एकीकडे सत्तेची ओवाळणी दिली, तर दुसरीकडे हिंदू मतांचा महायुतीवर पाऊस पडला व मुस्लिम मतांची टक्केवारी घसरल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने २२५ पेक्षा अधिक जागा जिंकत राज्यात एक वेगळा इतिहास रचला आहे. महायुतीने मुंबईत २०, तर महाराष्ट्रात ३३ जागा जिंकत आघाडी घेतली आहे.पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीचा कल सुरुवातीपासून महायुतीच्या बाजूने होता. या कलाचे रूपांतर निकालात होऊन महायुतीने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांत महाविकास आघाडीवर मात केली. जेमतेम सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा धडा घेऊन महायुतीने आपली निवडणूक रणनीती आखली आणि यशस्वी केली. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीत १४८ जागा लढविणाऱ्या एकट्या भाजपने १३३ जागा जिंकून स्वबळावर साध्या बहुमताकडे झेप घेतली आहे. भाजपच्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाने ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१जागा खिशात घातल्या आहेत. महाविकास आघाडीला फक्त ४५जागांवर समाधान मानावे लागले आहे. आघाडीत उद्धव ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १५, राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या आजवरच्या इतिहासातील ही सर्वात खराब कामगिरी आहे. २०१४ च्या मोदी लाटेत काँग्रेसने ४२ जागा जिंकल्या होत्या. तर १९९९ नंतर पक्ष स्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला अत्यंत मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यताराज्यात विधानसभा निवडणुकीत आलेल्या महायुतीच्या या महालाटेत महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे. महायुतीत एकट्या भाजपने १३२ हून अधिक जागा जिंकल्या आहेत. १९९० नंतर विधानसभा निवडणुकीत सार्वधिक जागा जिंकणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आव्हान परतून लावत भाजपने २०१४ पासून सलग तिसऱ्यांदा शतकी मजल मारली आहे. साहजिकच या ऐतिहासिक कामगिरीमुळे भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा सांगण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. नव्या सरकराचा शपथविधी वानखेडे स्टेडियम, शिवाजी पार्कवर होण्याची शक्यता आहे. दिग्गजांनी चाखली पराभवाची धूळया निवडणुकीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर, के. सी. पाडवी, वसंत पुरके, सुनील देशमुख, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, राजेंद्र शिंगणे, प्राजक्त तनपुरे, गुलाबराव देवकर आदींसह माजी राज्यमंत्री बच्चू कडू, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर तसेच क्षितीज ठाकूर यांना पराभवाचा जबरदस्त फटका बसला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, अतुल सावे, शिंदे गटाचे उदय सामंत, दीपक केसरकर, संजय राठोड, शंभूराज देशमुख, अब्दुल सत्तार तसेच अजित पवार गटाचे छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, मावळत्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिमाखदार विजय मिळवला आहे. महायुतीच्या या लाटेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत वाट पहावी लागली. महायुतीच्या लाटेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडीसह सर्वच छोटे वाहून गेले आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांचे नाव आघाडीवरमहायुतीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपचा मुख्यमंत्रिपदावर दावा असून या पदासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. भाजपचे नेते अमित शहा यांनी निवडणूक प्रचाराच्या एका जाहीर सभेत फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे सूतोवाच केले होते. मात्र, ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असे महायुतीत ठरलेले नाही, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पदासाठी आपली दावेदारी कायम ठेवली आहे. परंतु, त्याचवेळी महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून वाद नाही. तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेऊ, असा खुलासा शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, महायुतीत मुख्यमंत्रिपद भाजपकडे येणार असेल तर या पदासाठी भाजप श्रेष्ठी फडणवीस यांना संधी देतील की राजस्थान, मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात धक्कातंत्र वापरतील, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/rwI3cim

No comments:

Post a Comment