गोपाळ गुरव : आयपीएलच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी तब्बल ४६८ कोटी रुपये खर्ची झाले आणि ७२ खेळाडूं मालामाल झाल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलच्या लिलावाच्या पहिल्या दिवसाचे सर्व अपडेट्स, फक्त एकाच क्लिकवर वाचू शकता.आक्रमक फलंदाज ऋषभ पंतला लिलावात सर्वाधिक रक्कम मिळणार, असे संकेत माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने दिले होते. चेन्नई सुपर किंग्ज २४ ते २५ कोटी रुपये पंतसाठी मोजणार असल्याचे त्याने सांगितले होते. रैनाचा एक अंदाज खरा ठरला. पंतला रविवारी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या पहिल्या दिवसाच्या लिलावात सर्वाधिक २७ कोटी रुपये मिळाले. त्याला लखनौ सुपर जायंट्स संघाने खरेदी केले. लखनौ संघाचा यापूर्वीचा कर्णधार लोकेश राहुल होता. त्याची जागा पंत घेणार, हे जवळपास निश्चित आहे.कोलकाता संघाला विजेतेपद मिळवून देणाऱ्या श्रेयस अय्यरसाठी पंजाब किंग्ज संघाने २६.७५ कोटी रुपये मोजले. त्यामुळे काही क्षणासाठी अय्यर आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला होता. मात्र, पंतने त्याचा ‘विक्रम’ लगेचच मोडला. यात वेंकटेश अय्यरने सर्वांना धक्का दिला. त्याच्यासाठी कोलकाता संघाने २३.७५ कोटी रुपये मोजले. सर्वाधिक रक्कम शिल्लक असलेल्या पंजाब संघाने अर्शदीपसिंग आणि युझवेंद्र चहल या दोन्ही गोलंदाजांसाठी प्रत्येकी १८ कोटी रुपयांत खरेदी केले. परदेशी खेळाडूंमध्ये जोस बटलर पहिल्या दिवशी ‘महागडा’ ठरला. गुजरात संघाने त्याला १५.७५ कोटी रुपयांत खरेदी केले. लखनौचा कर्णधार असलेल्या लोकेश राहुलला दिल्ली संघाने आपल्या गोटात सामावून घेतले. त्याला १४ कोटी रुपये मिळाले. महंमद सिराजला १२.२५ कोटी (गुजरात), ईशान किशनला ११.२५ कोटी (हैदराबाद), महंमद शमीला १० कोटी (हैदराबाद) रुपयांत खरेदी करण्यात आले. यापूर्वी कोलकात्याने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसाठी २४.७५ कोटी रुपये खर्च केले होते. स्टार्क हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू होता. त्याआधी सॅम करन (१८.५ कोटी), ख्रिस मॉरिस (१६.२५ कोटी), युवराजसिंग (१६ कोटी), पॅट कमिन्स (१५.५ कोटी), ईशान किशन (१५.२५ कोटी), गौतम गंभीर (१४.९ कोटी) यांना लिलावात घसघशीत रक्कम मिळाली होती. मात्र, हे सर्व विक्रम या वर्षी झालेल्या ‘मेगा’ लिलावात मोडीत निघाले. आता सोमवारीही उर्वरित खेळाडूंची खरेदी होईल.पंतसाठी शर्यत पंतची आधारभूत किंमत दोन कोटी रुपये होती. त्याच्यासाठी पहिल्यांदा ‘लखनौ’ने उत्सुकता दाखवली. मग ‘बेंगळुरू’ने त्यात उडी घेतली. दोघांमध्ये पंतला घेण्यासाठी चढाओढ बघायला मिळाली. साडेदहा कोटी रुपये किंमत झाल्यानंतर ‘हैदराबाद’ शर्यतीत आले. हैदराबादने २० कोटी रुपयांमध्ये किंमत आणली. यानंतर २०.७५ कोटी रुपयांत ‘लखनौ’ने पंतला खरेदी केले असे वाटत असतानाच ‘दिल्ली’ने ‘आरटीएम’ कार्डचा वापर केला. मात्र, यानंतर ‘लखनौ’ संघाने त्याची किंमत थेट २७ कोटी रुपये केली. ‘दिल्ली’ने लगेचच माघार घेतली.
अय्यरला मोठी रक्कम
कोलकाता संघाचा माजी विजेता कर्णधार श्रेयस अय्यरला संघात घेण्याचे निश्चित करून ‘पंजाब’ संघ आला होता. कोलकाता, दिल्ली आणि पंजाबमध्ये शर्यत सुरू झाली. दिल्लीने त्याची किंमत २० कोटी रुपयांपर्यंत आणली. यानंतर ‘पंजाब’ने २४.२५ कोटी अशी विक्रमी किंमत देण्याची तयारी दशर्वली. ‘दिल्ली’ही मागे हटण्यास तयार नव्हते. त्यांनी २६ कोटी रुपयांपर्यंत किंमत वाढवत नेली. पंजाबही पुन्हा शर्यतीत आले आणि त्यांनी २६.७५ कोटी रुपयांत अय्यरला ‘फायनल’ केले.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/7dAYHEc
No comments:
Post a Comment