Breaking

Sunday, December 1, 2024

नामांकन अर्जासाठी १० हजार डिपॉझिट, फेर मतमोजणीसाठी १० लाख, हा कुठला न्याय? शरद पवारांच्या शिलेदाराचा सवाल https://ift.tt/qrdf8hy

इरफान शेख, सोलापूर : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पराभूत उमेदवारांना धक्का बसला आहे. सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार यांच्या विजयानंतर पराभूत झालेले उमेदवार यांनी संशय व्यक्त केला आहे. सोलापूर शहर उत्तर मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनीही ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त केला आहे. मी उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात मागील पंचवीस वर्षांपासून विकास कामे केली आहेत, त्याठिकाणी मला मतदान होत नसेल, तर राजकारण सोडून देतो. मला माहित तरी पडू द्या, जर खरच मला जनतेने नाकारले असेल, तर मी राजकारण सोडून देतो, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार महेश कोठे यांनी दिली आहे.

आमदार होण्यासाठी दहा हजार डिपॉझिट, फेर मतमोजणीसाठी मात्र दहा लाख -

सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील दोन मतदान केंद्रातील दोन मशिनची पडताळणी करण्यात यावी असा अर्ज करत महेश कोठेंनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. या पडताळणीसाठी ९४ हजार ४०० रुपयांचे चलनही त्यांनी भरले आहे. सोलापुरात पराभूत उमेदवारापैकी तुतारीचे उमेदवार महेश कोठेनी अर्ज भरून रोख रक्कम ही भरली आहे. आमदार होण्यासाठी अर्ज भरताना १० हजार रुपये डिपॉझिट प्रशासन घेतंय, मात्र फेर मतमोजणीसाठी एका ईव्हीएम मशीनसाठी ४० हजार आणि जीएसटी घेतला जात आहे. म्हणजे फेर मतमोजणीसाठी जवळपास दहा लाख रुपये भरावे लागत आहेत. हा कुठला न्याय? असा सवाल महेश कोठे यांनी उपस्थित केला आहे.

भाजपचे विजयकुमार देशमुख सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजयी -

सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे विजयकुमार देशमुख यांना १ लाख १७ हजार २१५ एवढी मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना ६२ हजार ६३२ एवढी मते मिळाली आहेत. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात वापरण्यात आलेल्या मशिन योग्य होत्या की नाही? याचीही खातरजमा यातून केली जाणार आहे.

दोन ईव्हीएम मशीन मधील मतमोजणी कशी होणार?

दाखल झालेल्या अर्जावर ४५ दिवसानंतर कार्यवाही केली जाणार आहे. महेश कोठे यांनी पुढे बोलताना माहिती दिली, की मी ज्या दोन मशीनवर संशय व्यक्त केला आहे, त्याची फेरमतमोजणी होणार नाही. निवडणूक अधिकारी दोन्ही मशीनवर दहा दहा वेळा बटन दाबून तपासणी करणार, मशीन खराब नव्हती एवढंच पाहिले जाणार आहे, अशी कशी फेरमतमोजणी, अशी संतप्त प्रतिक्रिया महेश कोठेंनी व्यक्त केली आहे.

... तर तुमच्या हातात एकहाती सत्ता देऊन आम्ही राजकारणतून मोकळे होतो -

ईव्हीएमवर निवडणूका घेण्याचा ठाम निर्णय भाजपचा असेल तर, निवडणूका कशाला घेता. आम्ही राजकारणपासून मोकळे होतो, एक हाती सत्ता भाजपच्या हातात देतो. इतक्या वर्षांपासून आम्ही विकास कामे करून सुद्धा लोकं आम्हाला मतदान करत नसतील, तर आम्ही निवडणुका लढवणार नाही, असे महेश कोठेंनी जाहीरपणे सांगितले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/dI9gUhM

No comments:

Post a Comment