मुंबई: बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील सुप्रसिद्ध निर्माती अनेकदा टीकेची धनी झाली आहे. तिला 'टीव्हीची क्वीन' असे जरी संबोधले जात असले तरीही तिच्यावर टाकी होतंच आली आहे. कधी तिच्या चित्रपटांची चर्चा होते, तर कधी मालिकांमधील दोष दाखवले जातात. तिच्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कंटेटवर तर नेहमीच ताशेरे ओढण्यात आलेत. आता ती '' हा सिनेमा घेऊन येत आहे, त्यावरही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये तिने धर्म आणि इतर धर्माच्या लोकांसाठी काही गोष्टींबद्दल भाष्य केले. 'द साबरमती रिपोर्ट'च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात एकताने हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. तिने म्हटले की, कोणालाही लक्ष्य न करता ही कथा सुंदरपणे मांडण्यात आली आहे. यावेळी बोलताना तिने हिंदू असण्यावरही दिला. एकता म्हणाली की, 'मी माझ्या आयुष्यात कधीही भीतीपोटी काम केले नाही. मी हिंदू आहे. हिंदू असण्याचा अर्थ म्हणजे तुम्ही धर्मनिरपेक्ष आहात. मी हिंदू असल्यामुळे इतर कोणत्याही धर्माबद्दल मी कधीही टीका करणार नाही. मला असे म्हणायचे आहे की मला सर्व धर्म आवडतात.' एकता कपूरने स्वतःच्या ट्रोलिंगवर म्हटलं की, 'पूर्वी मी कपाळावर टीळा लावायचे. मी टीळा लावण्यावरुन, हिंदू धर्म परिधान करण्यावर, माझे कडे-अंगठ्यांवर इतके विनोद केले गेले. मला कधी वाटायचे मी ग्रहणकाळात कुठेतरी जाऊन मंत्रोच्चार करावा, ध्यान करावे, तर त्यावरही जोक्स... पूजाही लपूनछपून करायचे.' एकताने सवाल केला ही अशा गोष्टीबद्दल लाज कसली बाळगायची?
दोन वेळा पुढे ढकलण्यात आला सिनेमा
एकता कपूर निर्मित 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट १५ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ही सिनेमा आधी मे महिन्यात आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र दोन्ही वेळा तो पुढे ढकलण्यात आला. हा चित्रपट २००२ साली घडलेल्या गोध्रा घटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये साबरमती एक्स्प्रेसला लागलेल्या आगीची कहाणी सांगितली जाणार आहे. यामध्ये , आणि राशी खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.दरम्यान या सिनेमाचा ट्रेलर ६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. सिनेमाची ही झलक समोर आल्यानंतरदेखील सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. एकताचा हा सिनेमा प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/niaJSmx
No comments:
Post a Comment