वॉशिंग्टन: अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यांचा विजय झाला. देशाचे ४७वे राष्ट्रपती म्हणून ते त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू करतील. निवडणुकीत त्यांनी कमला हॅरिस यांचा पराभव केला. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार ६.४९ अब्ज डॉलर असून ते आतापर्यंतचे सर्वात श्रीमंत अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे या वर्षी १.५ टक्के घसरण झाली असताना देखील ट्रम्प यांची संपत्ती ३.४ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ही वाढ ११० टक्के इतकी आहे. राष्ट्रपती झाल्यानंतर ट्रम्प यांना ४ लाख डॉलर म्हणजे ३.३७ कोटी इतके वर्षाला मानधन मिळणार आहे. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी त्यांची संपत्ती वाढली आणि ती ८ अब्ज डॉलर इतकी झाली. जी सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत दुप्पट आहे.राजकीय कारकिर्दीव्यतिरिक्त ट्रम्प यांनी आपली संपत्ती रिअल इस्टेटमधून आली आहे. यामध्ये ट्रम्प टॉवर आणि १, २९० एव्हेन्यू ऑफ द अमेरिकाजमधील स्टेकचा समावेश आहे. ट्रम्प यांच्याकडे ट्रम्प मीडिया अॅण्ड टेक्नॉलॉजी ग्रुपमधील शेअर आहेत. ट्रम्प यांच्या शेअरच्या किंमतींमध्ये अनेकदा चढ-उतार झाले आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार जुलै २०२४ पासून त्यांच्या एकूण संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. तेव्हा अध्यक्ष जो बायडेन हे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर झाले होते. ट्रम्प यांच्या विजयानंतर ट्रम्प मीडिया आणि टेक्नॉलॉजी ग्रुपच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसले. २०२४ साली फोर्ब्सच्या अमेरिकेतील ४०० श्रीमंत लोकांच्या यादीत ट्रम्प ३१९व्या स्थानावर होते. ट्रम्प यांच्याकडील मार ए लागो रिसॉर्टच्या उत्पन्नात गेल्या आर्थिक वर्षात ४६ लाख डॉलरची वाढ झाली होती. अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांवर काही खटले देखील सुरू आहेत. ज्यात दोन खटले केंद्रीय न्यायालयत म्हणजे फेडरल कोर्टात तर दोन घटले राज्यांमधील न्यायालयात सुरू आहेत. २०२०च्या निवडणुकीत त्यांनी निकाल उलथवून लावण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच गोपनीय कागदपत्रे अवैधरित्या बाळगल्याचा आरोप आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/ADLydTV
No comments:
Post a Comment