मुंबई- सुष्मिता सेनने हिने काही वर्षांपूर्वी संपूर्ण भारताचे नाव मोठे केलेले. जगभरातल्या तरुणींना मागे टाकत ती मिस युनिव्हर्स बनलेली. मात्र जेव्हा तिने मिस इंडियामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला तेव्हा तिच्या वडिलांना खूप राग आलेला. त्यांनी अभिनेत्रीशी बोलणेही बंद केलेले. सुष्मिताच्या वडिलांना आपल्या मुलीने कोणत्या सौंदर्य स्पर्धेत भाग घ्यावा आणि स्विम सूट घालावा असे वाटत नव्हते कारण आपल्या मुलीने आयएएस अधिकारी व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. आज १९ नोव्हेंबरला सुष्मिता सेनचा ४८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचा मिस इंडिया बनण्यापूर्वीचा किस्सा जाणून घेऊ.'मिड डे'ला दिलेल्या मुलाखतीत सुष्मिता सेनने सांगितले की ती मिस इंडिया ब्युटी पेजंटमध्ये सहभागी होणार असल्याचे जेव्हा तिच्या वडिलांना कळल्यावर तिची स्वप्ने कधी विखूरली गेलेली. सुष्मिताच्या म्हणण्यानुसार, तिचे वडील शुबीर सेन भारतीय सैन्यात होते त्यामुळे आपल्या मुलीने आयएएस व्हावे अशी त्यांची इच्छा होती.मिस इंडिया आणि स्विमसूटच्या मुद्द्यावरून संताप म्हणाली, 'माझ्या कुटुंबातील कोणीही चित्रपटसृष्टीत नव्हते. मी आयएएस अधिकारी व्हावे अशी माझ्या वडिलांची इच्छा होती, त्यामुळे मी त्यानुसार तयारी करत होते. पण मला मिस इंडियाला जायचे आहे हे कळल्यावर बाबांवर बॉम्ब फुटला. त्यांनी माझ्याशी बोलणे बंद केले. मला तो क्षण अजूनही आठवतो जेव्हा मी बाबांशी बोलताना भावूक झाले होते मी त्यांना म्हटलेलं की मला स्वीम सुट घालायचा नाही पण तो शोचा एक भाग असल्यामुळे मला घालावा लागेल. मी तुम्हाला वचन देते की मी तो नीट सन्मानपूर्वक घालीन, त्यात काहीच वाईट दिसू देणार नाही.मिस युनिव्हर्स झाली तेव्हा वडिलांना अभिमान वाटलासुष्मिता म्हणाली की, या गोष्टींनंतरही वडिलांचा दृष्टिकोन बदलला नाही. सुष्मिताने अभ्यास सोडला आणि कॉलेजला न गेल्याचा त्यांना राग होता. ते म्हणाले की, आधी तुझा अभ्यास पूर्ण कर, पदवी मिळव आणि मग तुला जे हवे ते कर. यावर सुष्मिताने वडिलांना सांगितले होते की, ती आयुष्यात पदवीधर होणार आहे. सुष्मिता म्हणाली, 'मलाही हा त्रास आहे. मी रेनेलाही ड्रिगी मिळवायला लावली. ती माझी अट होती, जेणेकरून कोणीही असे म्हणू नये की तू हे केले नाहीस तर तू काय करणार? पण जेव्हा सुष्मिता सेनने मिस इंडियाचा ताज जिंकला तेव्हा वडिलांना खूप आनंद झाला होता. सुष्मिताने सांगितले की, जेव्हा मी मिस युनिव्हर्समध्ये सहभागी होणार असल्याचे समजलेले तेव्हा माझ्या वडिलांचे उर अभिमानाने भरून आले होते. मग हळूहळू त्यांना सगळ्या गोष्टी समजल्या.'आर्या 3'मध्ये दिसली सुष्मिता सेनसुष्मिता सेन शेवटची 'आर्य ३' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. सध्या तरी तिने कोणत्याच नवीन प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/Yyz7Rjo
No comments:
Post a Comment