Breaking

Monday, November 18, 2024

हे सगळं काही घडलं ना, त्याला एकमेव माणूस जबाबदार त्याचं नाव उद्धव ठाकरे; निवडणुकीच्या शेवटच्या प्रचार राज ठाकरेंनी तोफ डागली https://ift.tt/RKzlegO

मुंबई (प्रसाद रानडे ): मनसेचे अध्यक्ष यांनी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबई विक्रोळी येथील सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे. अरे गद्दार गद्दर काय करता, गद्दार तर त्या घरात बसलाय, असे सांगत ज्या बाळासाहेबांना त्रास दिला त्या छगन भुजबळ यांना हा माणूस घरी जेवायला बोलवतो यावरून समजून घ्या, पाच वर्षात काय काय घडलं, ते आठवा असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका करताना मागील सगळ्याच आठवणींना उजाळा दिला. राज ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यांवरती उपस्थितत्यांनीही टाळ्या वाजवून त्याला जोरदार प्रतिसाद दिला. केवळ एका माणसाने अख्या पक्षाची वाट लावली. आजवर अनेक लोक निघून गेले त्यांना हे म्हणतात गद्दार आहेत. अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय ज्यांनी पक्षाजवळ गद्दारी केली, असं सांगत राज ठाकरे यांनी एका कुटुंबाचे उदाहरण दिलं. कुटुंबामध्ये तीनही मुलं असतात सगळ्यांचे लग्न होतात सासूबाईंशी भांडण सुरू होतं, मुलगा म्हणतो आपण दुसरीकडे राहायला जाऊ ते दुसरीकडे राहायला जातात. दुसऱ्या तिसऱ्या वेळी हीच परिस्थिती निर्माण होते. त्या वेळेला लोक म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आले ना की फक्त घर फोडतात पण तिसरी सून आल्यावरही सासू जवळ भांडण होतं आणि तिसरा मुलगाही म्हणतो की मला आता घर सोडायचा आहे. त्या वेळेला लोक म्हणतात की, काहीतरी सासू मध्ये प्रॉब्लेम आहे. कळलं का जशी ही शिवसेनेची सासू आतमध्ये बसली आहे ना; तिचा प्रॉब्लेम आहे, असं सांगत राज ठाकरे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ही जी मुलं सोडून गेली ना त्यांचा नाही प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम सासूचा आहे, असं सांगत मला असं वाटतं की एक गोष्ट लक्षात घ्या की या लोकांनी तुमच्या मतांचा अपमान केला आहे. त्याचा बदला तुम्ही घेतला पाहिजे आणि मला असं वाटतं की ही निवडणूक त्याचीच आहे, असे राज ठाकरे म्हणाले.महाराष्ट्रात मी या सगळ्या गोष्टी सांगत आहे, ते हेच की जर का या सगळ्या गोष्टीची आणि प्रसारण केली ना आणि जर का ते जे झाले तर मला असं वाटतं की महाराष्ट्रात संपला म्हणून समजायचं, अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी वरती जोरदार तोफ डागली आहे. आज मी तुमच्याकडे आलो आहे तर केवळ 2019 पासून काय घडलं ते अजिबात विसरू नका आणि या सगळ्या गोष्टीला हे जे काय आजवर घडलं आहे त्या सगळ्या गोष्टीला एकमेव माणूस जबाबदार आहे आणि त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वरती जहरी टीका केली. हा एकच माणूस दुसरं कोणी नाही तिथून सगळे सुरुवात झाली. राज ठाकरे यांनी सांगितले की, बघा याच माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले, मग मी बाहेर पडलो, मग शिंदे बाहेर पडले. पण जो माणूस बाळासाहेबांना सगळ्यात पहिल्यांदा त्रास देऊन गेला ते छगन भुजबळ. त्या भुजबळांबरोबर हा माणूस मातोश्री वरती जेवायला बोलवतो म्हणजे त्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला त्याचं याला काहीच नाही आणि बाकीचे सगळे याचे शत्रू अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावला आहे. त्यामुळे वीस तारखेला मतदान करताना या सगळ्याचा विचार करा अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेल्या नाराजीला निवडणुकीच्या शेवटच्या प्रचार टप्प्यात वाचा फोडली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/xyradTB

No comments:

Post a Comment