Breaking

Monday, November 18, 2024

अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया, शरद पवारांनी दिला कडक इशारा https://ift.tt/TzPwGUf

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावताच मोठी घटना घडली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काटोलचे उमेदवार सलील देशमुख यांची नरखेड मधील प्रचार सभा आटोपून घरी परतत असताना देशमुखांवर अज्ञातांकडून हा हल्ला करण्यात आला आहे. देशमुख काटोलच्या दिशेने निघाले असताना जलालखेडा मार्गावरील बेलफाटा येथे त्यांच्या कारची गती झाली होती. यांची संधी साधून त्यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये देशमुखांच्या डोक्याला जबर मार बसला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार पक्षांच्या नेत्यांसह अन्य बड्या नेत्यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. पवार म्हणाले, अनिल देशमुख हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी गृहमंत्री म्हणून कारभार सांभाळला आहे. अशा सुसंस्कृत व्यक्तींवर हल्ला होणे निषेधार्थ आहे. याप्रकरणी सरकारने ठोस पावलं उचलावीत, अन्यथा संघर्षाची भूमिका घेणार अशी संतप्त प्रतिक्रिया पवारांनी दिली. 'राज्याचे गृहमंत्री ज्या जिल्ह्यातून येतात, त्या नागपूर जिल्ह्यात एका माजी गृहमंत्र्यांवर प्राणघातक हल्ला होतो. यावरून राज्यात कायद्याचे राज्य नाही हे स्पष्ट झाले आहे,' अशी टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी केली. तर समाजवादी पक्षाचे आमदार रईस यांनीही भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर दुष्कर्मांनी केलेला भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे.अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा ऱ्हास दिसून येतो.' खासदार सुप्रिया सुळेंनी देखील या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्या म्हणाल्या ही घटना धक्कादायक आहे, एका सशक्त लोकशाहीमध्ये कुठल्याही पक्षाच्या नेता, कार्यकर्ता किंवा नागरिकावर असा हल्ला होऊ नये. याचा मी जाहीर निषेध व्यक्त करते. प्रचंड अस्वस्थ करणारी बातमी आहे. अतिशय भयानक आहे. ही कृती संविधानाच्या विरोधात आहे. या राज्यात क्राईम वाढला आहे, याचं गलिच्छ घाणेरडं उदाहरण आहे. पोलिसांनी याचं उत्तर द्यावं. हे गलिच्छ काम लोकशाहीच्या विरोधात आहे. या महाराष्ट्रात चाललंय काय?’,असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/b1734Gr

No comments:

Post a Comment