Breaking

Monday, December 16, 2024

CM चा लेक म्हणजे तो बिघडलेलाच! जिनिलियाचा पहिल्या भेटीत झालेला गैरसमज, असं फुललं रितेशसोबतचं नातं https://ift.tt/Lw1KRBd

मुंबआ- आज १७ डिसेंबरला रितेश देशमुखचा आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. हा जरी बॉलिवूड अभिनेता असला तरीही तो लहानाचा मोठा राजकीय पार्श्वभूमीत झाला. त्यांचे वडील बरीच वर्षे होते. मात्र तरीही रितेश देशमुखने राजकारणात न जाता चित्रपटात करिअर करण्याचा निर्णय घेतला. रितेश देशमुख आज बॉलिवूडमधील यशस्वी स्टार्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. याशिवाय रितेश आणि जेनेलिया डिसूझाची गणना बॉलिवूडच्या आदर्श जोडप्यांमध्ये केली जाते. रितेश देशमुखचा चित्रपट प्रवास जसा रोमांचक आहे, त्याचप्रमाणे त्याची प्रेमकथाही अतिशय फिल्मी आहे. रितेश देशमुखला जिनिलियाची प्रत्येक गोष्ट आवडते. पण जेव्हा लोक तिच्यामुळे त्याला ओळखतात तेव्हा मात्र त्याचा इगो हर्ट होतो. रितेश देशमुखच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याची रंजक प्रेमकहाणी. रितेश देशमुखने २००३ मध्ये 'तुझे मेरी कसम' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट फ्लॉप झाला, पण त्यातून अभिनेत्याला त्याची जीवनसाथी मिळाली. या चित्रपटात जेनेलिया आणि रितेश देशमुख यांची ऑनस्क्रिन जोडी पहायला मिळाली. रितेशने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा त्याने 'तुझे मेरी कसम'मध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा तो लूक टेस्टसाठी हैदराबादला गेला होता. या चित्रपटात त्याची हिरोईनही असणार असल्याचे त्याला सांगण्यात आले. रितेश देशमुखने विमानतळावर जेनेलिया आणि तिच्या आईची भेट घेतली. मात्र जेनेलियाने रितेशकडे दुर्लक्ष केले. रितेशला आश्चर्य वाटले की ही मुलगी त्याला पाहून तोंड का मुरडत आहे. रितेश देशमुख हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याचे चित्रपटाच्या शूटिंगच्या दोनच दिवस आधी तिला समजले होते, असे जिनिलियाने एकदा सांगितले होते. त्यामुळे तिचा असा समज झालेला की याचे वडील जर मुख्यमंत्री असतील तर रितेश नक्कीच बिघडलेला असेल. त्यामुळे जिनिलियाने रितेशला अटिट्यूड दाखवायला सुरुवात केली. रितेश देशमुख आणि जिनिलिया यांच्या लग्नाला १२ वर्षे झाली आहेत, पण त्यांच्यात क्वचितच भांडणे होतात. त्यांच्यात मतभेद असले तरी ते कधीच एकमेकांवर ओरडत नाहीत. रितेशने सांगितले होते की भांडण झाल्यास तो आधी जेनेलियाला सॉरी बोलतो.. रितेश देशमुख एकदा कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये आला होता, तेव्हा त्याने सांगितले की, जेनेलियाचा नवरा म्हटल्यावर त्याचा इगो दुखावला गेला. रितेशने सांगितले होते की, एकदा साऊथची एक टीम सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये खेळत होती. त्या संघातील दोन खेळाडूंनी रितेशला पाहिले आणि त्याला 'जिनिलियाचा नवरा' म्हणून हाक मारली. यामुळे अभिनेत्याचा इगो दुखावला गेला होता. तेव्हा रितेशने त्यांना सांगितले की महाराष्ट्रात ती रितेशची पत्नी आहे तर दक्षिणेत लोक त्याला जिनिलियाचा नवरा म्हणतात. तेव्हा ते खेळाडू रितेशला म्हणाले, 'रितेशची पत्नी फक्त एकाच राज्यात बोलतात, पण जेनेलियाचा नवरा केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये बोलतात'.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/YL4QKiM

No comments:

Post a Comment